अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय वायु सेनेचे सेवानिवृत्त अधिकारी अॅड. शिवाजी डमाळे यांची सैनिक समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निवृत कर्नल बलबीरसिंह परमार यांनी डमाळे यांच्या नियुक्तीची घोषणा करुन नियुक्ती पत्र पाठविले आहे.

अहमदनगर जिल्हा सैनिक समाज पार्टीच्या वतीने अॅड. शिवाजी डमाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सुभेदार भाऊसाहेब आंधळे, अरुण खिची, दिपक वर्मा, आशा पालवे, लखन जाधव, नितिन मोहळकर, जालिंदर जाधव, अॅड. संदिप डमाळे, अॅड. स्वाती गायकवाड, अॅड. हर्षदा अनाप आदी उपस्थित होते.
अॅड. शिवाजी डमाळे म्हणाले की, राजकारणातील प्रस्थापितांची घराणेशाही मोडून काढण्याचा सैनिक समाज पार्टीचा निर्धार आहे. 2024 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकित हा पक्ष पुर्ण ताकतीने उतरणार आहे.
प्रस्थापित पैश्याच्या जीवावर भ्रष्ट मार्गाने सत्तेत आले असल्याचा आरोप करुन, खरी लोकशाही असतित्वात आनण्यासाठी समाजातील सज्जन, इमानदार व देशभक्त नागरिकांमधून उमेदवार निवडून आणण्यास हा पक्ष प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
भाऊसाहेब आंधळे यांनी देशभक्त विचारधारेचा व कायदेविषयक ज्ञानाचा अॅड. डमाळे यांच्या माध्यमातून पक्षाला फायदा होणार आहे. राज्यात संघटन वाढीसाठी माजी सैनिक मोठ्या संख्येने पक्षाशी जोडले जाणार आहे.
माजी सैनिक सैनिक समाज पार्टीचे ध्येय-धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून बदल घडवणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या निवडीबद्दल अॅड. डमाळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.