सोयाबीन उत्पादक महिला शेतकर्‍यांसाठी वडगाव गुप्ता येथे शेतीशाळा संपन्न

0
119
अहमदनगर प्रतिनिधी –
सोयाबीन उत्पादक महिला शेतकर्‍यांसाठी नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथे किड व रोग नियंत्रण सर्व्हेक्षण व सल्ला प्रकल्प, खरिप हंगाम (सन 2021-22) अंतर्गत कृषी विभागाच्या वतीने शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शेतीशाळेमध्ये सोयाबीन व खरिप पिकाचे एकात्मिक किड व रोग नियंत्रण याबद्दल महिला शेतकर्‍यांना यथायोग्य मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महिला अधिकार्‍यांशी संवाद साधताना महिला शेतकरी भारावून गेल्या होत्या. उत्स्फूर्तपणे संवाद साधून त्यांनी आपल्या शंका-कुशंकांचे निरसन करून घेतले. येणार्‍या अडीअडचणींचे सविस्तर विवेचन करून त्यांचे निरसन करून घेतले.
याप्रसंगी एकात्मिक किड नियंत्रणाचा महत्त्वाचा घटक असलेल्या फेरोमन सापळ्यांचे उपस्थित महिला शेतकर्‍यांना वितरण करण्यात येऊन सापळे लावणे व निरीक्षण घेणे याची माहितीही त्यांना देण्यात आली. महिला शेती शाळांचे आयोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
वडगाव गुप्ता येथील शेतीशाळेत अश्विनी पोपट वामन, जयश्री देवराम गिते, नंदाबाई यशवंत शेवाळे, संगीता बाळासाहेब वामन, दीपाली दत्तात्रय गिते, ताराबाई वामन, मंदा अंबादास गिते, सिंधूबाई वामन, रंजना हरिदास वामन व इतर शेतकरी महिला उपस्थित होत्या.
शेतीशाळेत श्रीमती सुविधा वाणी यांनी मार्गदर्शन केले. शेतीशाळेचे आयोजन व सूत्रसंचालन वडगाव गुप्ताच्या कृषी सहाय्यक श्रीमती नीता गिरी यांनी केले. यावेळी जेऊर मंडळ कृषी अधिकारी विजय सोमवंशी, कर्जुनेखारे कृषी सहाय्यक सतीश गोसावी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here