सौरऊर्जा पथदिवे काळाची गरज : मा. नगरसेवक अजिंक्य बोरकर

0
95

प्रभाग क्र.४ मध्ये विविध ठिकाणी सौर पथदिवे बसविले

अहमदनगर प्रतिनिधी : लहू दळवी

आपले वर ऊर्जानिर्मितीचे संकट ओढवण्याची दाट शक्यता आहे.याच बरोबर ऊर्जानिर्मितीसाठी मोठा आर्थिक खर्च येत असतो यासाठी नागरिका मध्ये सौर ऊर्जा बाबत जनजागृती व्हावी जेणेकरून आर्थिक बचत होणार आहे.

आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक चार मध्ये गंगा उद्यान,तारकपूर मधील सिंधी कॉलनी, मार्केट सोसायटी मधील हनुमान मंदिर,पंकज कॉलनी येथील दत्त मंदिर तसेच सिव्हील हडको परिसरामध्ये सौर ऊर्जा पथदिवे बसविण्यात आले आहे आहेत भविष्यकाळात सौर ऊर्जा पथदिवे ही काळाची गरज बनणार आहे असे प्रतिपादन मा.नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी व्यक्त केले.

प्रभाग क्रमांक ४ मध्ये नगरसेविका शोभाताई बोरकर यांच्या प्रयत्नातून विविध ठिकाणी सौर ऊर्जा पथदिवे बसविण्यात आली असून पंकज कॉलनीतील दत्त मंदिर येथे सौर ऊर्जा पथदिव्यांचा लोकार्पण सोहळा रमेश खिलारी यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी समवेत मा.नगरसेवक अजिंक्य बोरकर,नूतन खिलारी,सतिष गुंफेकर, धनश्री गुंफेकर,चिंटू गंभीर, जालिंदर बोरुडे, दीपक परदेशी, नारायण कराड, सुभाष घुगे,रोहन खिलारी,बब्बू नवलाने,राहुल जाधव,संजय जाधोर,मनू देशपांडे, हर्षल बांगर, आर.एस.जाधव,ऋषिकेश सोले, तेजस बोरुडे,आयुष लहारे, प्रतीक बोगे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना रमेश खिलारी म्हणले की,नगरसेविका शोभा ताई बोरकर व अजिंक्य बोरकर यांच्या प्रयत्नातून भरीव विकास कामे झाली आहेत.

आम्हा नागरिकांना विविध प्रश्नांसाठी कधीही कोणाकडेही जावे लागत नाही स्वतः होऊन आमची प्रलंबित कामे यांच्या माध्यमातून पूर्ण होतात. पंकज कॉलनीतील दत्त मंदिर परिसरात सौरऊर्जा दिवा बसविल्यामुळे हा परिसर प्रकाशमान झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here