डॉ.राजेंद्र प्रसाद विद्यालय,पारगाव, सुद्रीक
या शाळेतील शिक्षिका सौ.शारदा लोंढे(शिरवाळे)
यांनी आपली भाची प्रियंका नवगिरे (जगधने) बद्दल केलेली एक भावनिक कविता …
गाव माझ्या मामाच
झुक झुकू झुक झुकू आगीन गाडी,
धुरांच्या रेषा हवेत सोडी,
पळती झाडे पाहूया,
मामाच्या गावाला जाऊया…
या उक्तीप्रमाणे मनातील आनंद ओसंडून वाहू द्या.
वाहणाऱ्या त्या आनंदातून आठवणींना घट्ट पकडून ठेवा.
आठवणीचा हा अमोल ठेवा हृदयात साठवून ठेवा.
नव्या दिवसाची सुरुवात नव्या उत्साहात गगनभरारी गरुड झेप असू द्या.
मनात दमल्या थकल्याच्या जाणिवा ठेवून द्या.
कप्प्यात नोकरी म्हणजे साधन जगण्याचे.
पण खरे जगणे ही तितकेच महत्त्वाचे..
संसाररूपी वेलीला आलेली गुलाबाची फुले त्या वेलीला असणारे नोकरीचे काटे एक अजब अनुभव तरीही गुलाबाचे आकर्षण आजतागायत इतिहासात नाही झाले कमी.
हॅलो:- पिंकी ताई – पुन्हा यायचं बरं मामाच्या गावाला
सोबत घेऊन ईशान आणि परीला
(मामा-मामी)
श्री. दादासाहेब शिरवाळे/सौ.शारदा लोंढे (शिरवाळे)