विकाट सिमेंटच्या अल्टिमेट या नविन ब्रँडचे एसा सभासदांच्या उपस्थितीत शानदार लॉन्चिंग
स्टील ऐवजी बांबूचा वापर पर्यावरणपूरक इमारतींना वापरल्यास स्वस्तात बांधकाम शक्य – इंजि. मधुकर बालटे
नगर : आर्किटेक्ट इंजिनीअर्स अँड सर्व्हअर्स असो अहमदनगर आणि विकाट सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने अल्टिमेट सिमेंट या व्हीकॅट कंपनीच्या नवीन ब्रँडचे लॉन्चिंग संस्था अध्यक्ष रमेश कार्ले आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यासाठी विकाट अल्टिमेट सिमेंटचे महाराष्ट्र ट्रेड हेड आलोककुमार नंदा, पुणे व नगर ब्रांच हेड अविषेक कुमार , टेक्निकल हेड केदार जोशी व नितीन झिटे, कंपनीचे इतर अधिकारी, एसा अध्यक्ष रमेश कार्ले, उपाध्यक्ष आदिनाथ दहिफळे, सचिव प्रदिप तांदळे, आकांक्षा सेल्सचे अनिल धोकरिया, अनमोल जैन, एस यू खान, राजकुमार मुनोत, यश शहा, प्रीतेश पाटोळे, संकेत पादीर, मयुरेश देशमुख, अन्वर शेख, देवेंद्र पोतदार, प्रकाश जैन, निकिता बालटे आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी केदार जोशी आणि आलोक कुमार नंदा यांनी विकाट सिमेंट हा सर्वात जुना ब्रँड असून अल्टिमेट सिमेंट हे आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि रोबोट टेक्नॉलॉजीचा वापर करून बनवलेले सिमेंट असून ते सर्वोत्तम असे मटेरियल वापरून बनवलेले सिमेंट असून त्याचा वापर करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
अल्टिमेट सिमेंटचा लॉन्चिंग कार्यक्रम आपण नगर जिल्ह्यात प्रथमतः एसाचे सर्व उपस्थितांच्या उपस्थितीत करत असल्याचे एसा अध्यक्ष कार्ले यांनी सांगितले. तसेच बांधकामात उच्च दर्जाचे साहित्य वापरल्यास त्याचे आयुष्य आणि ताकद निश्चितच वाढण्यास मदत होते हे नमुद केले. बांबूचा स्टील ऐवजी काँक्रिटमध्ये वापर या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलताना इंजि. मधुकर बालटे आणि अजिंक्य बालटे यांनी १९९० साली नगर मध्ये नायडू यांच्या कामात प्रथमतः स्टील ऐवजी बांबू काँक्रिट मध्ये वापरला गेल्याचे सांगितले. नंतर नगर, पांढरी पुल आणि पुण्यातील कामामध्ये स्लॅब,बेड काँक्रिट आणि कंपाउंड मधील आर सी सी कामात बांबू वापरल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय मानांकन कोड मधील आर सी सी कामासाठी असलेल्या तरतुदीचा आधार घेऊन स्टील ऐवजी जिथे शक्य असेल तिथे बांबूचा वापर करण्याचा यशस्वी प्रयोग केल्याचे बालटे यांनी सांगितले. यामुळे कामातील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो, स्टील पेक्षा बांबूला एक चतुर्थांश खर्च कमी लागतो. बांबू गोलाईमध्ये चार अथवा दोन भागात कट करणे आवश्यक असल्याचे सांगून या कामाचे आयुष्य आर सी सी कामा इतकेच असू शकते जर काम करताना योग्य पद्धतीने काळजी घेतली तर. बांबू हा उत्तम वाळलेला आणि कमीत कमी दोन इंच व्यासाच्या पाहिजे त्याची लांबी दहा फुटपेक्षा जास्त हवी तसेच तो गोलाईत काप घेऊन वापरावा, बांबू रुंदित अखंडपणे वापरू नये . या वेळी त्यांनी केलेल्या विविध कामाचे दाखले आणि फोटोग्राफ सादर केले. बांबू किती जाडीचा असावा त्याची लांबी आणि किती काप घ्यावेत या विषयी त्यांनी विस्तृत सादरीकरण केले . स्टीलचा अवास्तव वापर करण्यापेक्षा बांबूचा पर्यावरणपूरक कामात वापर केल्यास निश्चितच आपण कामातील आर्थिक खर्च वाचवू शकतो. भविष्यात यामध्ये आणखी संशोधन करून आपण जास्तीत जास्त स्टील ऐवजी बांबूचा वापर शास्त्रीय दृष्ट्या कसा करू शकतो यावर मार्गदर्शन केले.
यावेळी प्रदिप तांदळे यांनी कार्यक्रमांचे सूत्र संचालन केले तर यश शहा यांनी उपस्थितांचे आभार मानले.