- Advertisement -
स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रॅली संपन्न.
बोल्हेगाव परिसर हा विकास कामातून प्रकाशमय झाला – आ. जगताप
नगर – बोल्हेगाव, नागापूर हा परिसर ग्रामीण भाग, शेती मळ्याचा म्हणून ओळखला जात होता. मात्र आता माजी सभापती कुमार सिंह वाकळे यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्रित करून शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम केले असल्यामुळेच बोल्हेगाव परिसर हा विकास कामातून प्रकाशमय झाला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाला प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्याला राज्यघटनेच्या माध्यमातून समान अधिकार दिले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण सर्वजण मोठ्या उत्साहात साजरी करत असतो. याचबरोबर त्यांचे विचार देखील आत्मसात करून युवकांनी वाटचाल करावी. बोल्हेगावचे नियोजनबद्ध विकास कामे मार्गे लावले असल्यामुळेच या परिसराला शहरीकरणाचे रूप प्राप्त झाले आहे. माजी स्थायी समिती सभापती कुमार सिंह वाकळे यांनी दर्जेदार कायमस्वरूपीची कामे टप्प्याटप्प्याने मार्गे लावले असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
बोल्हेगाव येथे माजी स्थायी समिती सभापती कुमार सिंह वाकळे यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संग्राम जगताप समवेत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी सभापती कुमार सिंह वाकळे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असे काम उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांना बरोबर घेऊन आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून विकासाची कामे मार्गी लावली आहे. बोल्हेगाव परिसरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन विकास कामांचे स्वागत केले आहे. असे ते म्हणाले.
- Advertisement -