स्नेहबंध फाउंडेशनतर्फे पर्यटन मित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल वल्लाल यांचा सत्कार

0
84

शिल्पकार वल्लाल पर्यटनास चालना देणारे व्यक्तिमत्त्व – उद्धव शिंदे

अहमदनगर प्रतिनिधी – नगर शहर परिसरात अनेक ऐतिहासिक,धार्मिक वास्तू आहेत.त्यांचा आपल्या शिल्पकलेद्वारे प्रचार व प्रसार करणारे शिल्पकार बालाजी वल्लाल हे नगरच्या पर्यटनास चालना देणारे व्यक्तिमत्त्व आहे,असे प्रतिपादन स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त नाशिक येथील पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन व ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिकतर्फे नगरमधील शिल्पकार बालाजी वल्लाल यांना ‘पर्यटन मित्र २०२१’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्त त्यांचा स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने शाल, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी ते शिंदे बोलत होते.

याप्रसंगी सपना वल्लाल, अवनीश वल्लाल, सचिन पेंडुरकर, हेमंत ढाकेफळकर, संकेत शेलार आदी उपस्थित होते.

स्नेहबंधचे अध्यक्ष शिंदे म्हणाले, वल्लाल यांनी नगर व परिसरातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांच्या प्रतिकृती साकारुन त्याचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले. त्यांच्या या कार्याचाी दखल घेत त्यांना पर्यटन मित्र या पुरस्काराने गौरवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here