अहमदनगर प्रतिनिधी – स्नेहबंध फौंडेशनच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त नगर शहरातील १२ वर्षाखालील मुला-मुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ज्यांना सहभाग घ्यावयाचा आहे,त्यांनी आपले पूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबर १५ ऑक्टोबर पर्यंत 8793191919 या क्रमांकावर नुकताच मोबाईलवर काढलेला फोटो पाठवावा.(फोटो जुना व फोटो कॅमेरा मधील फोटो चालणार नाही.) कृपया कोणीही फोन करू नये.

स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती परीक्षण करून पहिल्या तीन स्पर्धकांना मान्यवरांचा उपस्थितीत दसरा झाल्यानंतर गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेत प्रवेश मोफत आहे.