स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून उद्योगमंत्र्यांना एमआयडीसी मंजुरीसाठी कळकळीची विनंती…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

कर्जत-जामखेड एमआयडीसीच्या अंतिम मंजुरीसाठी मतदारसंघातील युवकाचं उद्योगमंत्र्यांना थेट रक्ताने पत्र

जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण) – गेल्या काही दिवसांपासून कर्जत जामखेड मतदारसंघातील एमआयडीसी मंजुरीचा मुद्दा हा चांगलाच तापला असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी या मंजुरीसाठी आमदार रोहित पवार हे देखील विधान भवन परिसरात आंदोलनाला बसले होते.


दरम्यान, राज्य सरकार एमआयडीसीला मंजुरी देत नसल्याने व त्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने मतदारसंघातील नागरिक व युवांनी देखील विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले होते. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात देखील कर्जत जामखेड एमआयडीसी मंजुरी बाबतचे फलक झळकावल्याचे पाहायला मिळाले. एवढं सगळं करूनही शासन अजूनही एमआयडीसीला मंजुरी देत नसल्याने कर्जत जामखेड मतदारसंघातील नान्नज या गावातील अमर चाऊस या युवकाने स्वतःच्या रक्ताने थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांना एमआयडीसी लवकरात लवकर मंजूर करून द्यावी यासाठी पत्र लिहिले आहे.

उद्योग मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिलेला मजकूर खालील प्रमाणे –

“मा. उद्योगमंत्री उदय सामंत साहेब, एक सर्वसामान्य बेरोजगार युवक म्हणून आमच्या कर्जत जामखेड तालुक्यातील सर्व युवा व नागरिकांच्या वतीने माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की आमच्या हक्काच्या एमआयडीसीला कृपा करून मंजुरी द्या आणि आमच्या हाताला काम मिळू द्या! आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचा आणि गंभीर परिस्थितीचा विचार करून रोहितदादांच्या एमआयडीसीबाबतीतच्या मागणीला मान्य करा एवढीच कळकळीची विनंती!”

अशा आशयाचं पत्र थेट स्वतःच्या रक्ताने लिहून ते आता उद्योग मंत्र्यांना दिले जाणार आहे. यावरून तरुणांमध्ये एमआयडीसी व्हावी याबाबत किती तीव्र इच्छा आहे हे दिसून येत आहे. सरकारने लवकरात लवकर एमआयडीसी मंजुरी बाबतचा हा तिढा सोडवावा अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व युवांकडून व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!