चौपाटी कारंजा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा व परिसर सुशोभीकरणा बाबत आ.संग्राम जगताप यांनी पाहणी
अहमदनगर प्रतिनिधी – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेऊन देशासाठी बलिदान दिले सावरकरांच्या इतिहासाची ओळख तरुण पिढीला आत्मसात व्हावी यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणाचे काम होणे गरजेचे आहे यासाठी अहमदनगर जिल्हा पुरोहित मंडळ, स्वातंत्र्यवीर सावरकर उत्सव समिती व चौपाटी कारंजा मित्र मंडळाच्या वतीने सावरकरांच्या पुतळ्याची व चौक सुशोभीकरणाच्या मागणी केली असून त्यानुसार लवकरच भव्यदिव्य वीर सावरकर पुतळा व परिसराचे सुशोभिकरण करणार असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
चौपाटी कारंजा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतुळा व परिसर सुशोभीकरण कामासंदर्भात आ.संग्राम जगताप यांनी पाहणी केली.यावेळी उपमहापौर गणेश भोसले, मा.उपमहापौर दीपक सूळ, अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रदीप पठारे, नगररचनाकार अजय चारठनकर, शहर अभियंता सुरेश इथापे, मा.शहर अभियंता एन.डी कुलकर्णी, ज्येष्ठ नेते श्रीराम येडे, मयूर जोशी, अमोल भंडारी, महेश कुलकर्णी, बाप्पू राजेभोसले, आदिनाथ येंडे, प्रसन्न बिडकर, उदय अनभुले, सुचित भळकट, मनिष भंडारी आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी एन.डी.कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणाचे बाबत माहिती दिली.