भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमला
अहमदनगर प्रतिनिधी : विक्रम लोखंडे
केडगाव येथील सरस्वती प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिरच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी परिसरातून भव्य शोभायात्रा काढून भारत माता की जय असा जयघोष केला.
स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषेतील विद्यार्थी रथात स्वार झाले होते. भारत मातेची पालखी, सैनिकांच्या वेशभूषेतील मुले, तिरंगा ध्वजधारक विद्यार्थी पथक या शोभायात्रेत सहभागी झाले होते.
यावेळी संस्थेचे विश्वस्त व शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष दत्ता जगताप, बीएड कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र चोभे, संतोष साकला , पवन शर्मा यांनी प्रभात फेरीत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.
या शोभायात्रेवेळी शिक्षकांचाही उत्साह दिसून आला. सर्व शिक्षिका एकाच रंगाच्या साड्या परिधान करून शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या.
शोभायात्रेत अर्चना कुलकर्णी, अनिता क्षीरसागर, नंदा भोर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संदिप भोर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी, मनीषा वर्पे, मनीषा चव्हाण, मनीषा गवांदे, शिवाजी मगर, अविनाश साठे, अविनाश भांडारकर, शर्मिला पारधे, लक्ष्मण साके, दीपक आढाव, सतीश लवांडे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी परिसरातील नागरिक व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.