अहमदनगर प्रतिनिधी – काशिनाथ बोरगे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नगर तालुक्यातील अरणगाव येथील अवतार मेहेरबाबा विदयालयात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष, नवभारत साक्षरता अभियान, माझा देश माझी माती, स्वच्छता ,पर्यावरण,इत्यादी विषयावर आधारीत विद्यार्थ्यांनी तयार केलेले तक्ते, पोस्टर, तृणधान्यावर आधारित पाककृती, रांगोळी यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन अवतार मेहेरबाबा पी. पी. सी. ट्रस्टचे ट्रस्टी रमेशराव जंगले व मेहेर प्रसाद राजू यांचे हस्ते करण्यात आले.या प्रसंगी अरणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख उदयकुमार सोनावळे, कृषि पर्यवेक्षक प्रतिमा राऊळ, कृषि सहाय्यक मंदा भारती,विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक झिने व सर्व शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ उपस्थित होता.
प्रास्तविकात बोलताना, विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक झिने यांनी शासकीय योजना व उपक्रम यांची चांगल्या रितीने अंमलबजावणी व्हावी,जनजागृती व्हावी उपक्रमः प्रत्यक्ष कागदावर न राहता कृतीत उतरावा हा प्रदर्शन भरवण्यामागचा हेतू असून तृणधान्य नामशेष होण्याच्या मार्गावर असून तृणधान्याचा प्रचार प्रसार आहारात समावेश होणे गरजेचे असल्याचे सांगितले. विद्यालय अशाच प्रकारचे उपक्रम यापुढेही राबवणार असल्याचे सांगितले.
तृणधान्य व त्याच्या पौष्टीक घटकाविषयी कृषि पर्यवेक्षक प्रतिभा राऊळ व मंदा भारती यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटक रमेश जंगले व मेहेर प्रसाद राजू यांनी प्रदर्शन पाहून पुढील वाटचालीस विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनावळे साहेब यांनी अवतार मेहेरबाबा विद्यालय ही उपक्रम राबवणारी केंद्रातील पहीली शाळा असल्याचे सांगितले.असाच उपक्रम केंद्रातील इतर शाळांनी राबवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
आभार रावसाहेब शिंदे यांनी केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल देवकर व श्रीमती सुरेखा गाडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ‘विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱी, पालक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.