स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाल्याबद्दल न्यु आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाचा राष्ट्रवादीच्या वतीने गौरव;प्राचार्य,उपप्राचार्यांचा सन्मान

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

न्यु आटर्स महाविद्यालयाने गुणवत्तेची एक वेगळी ओळख निर्माण – आमदार संग्राम जगताप

अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख

जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यु आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) वतीने स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाल्याबद्दल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे, उपप्राचार्य डॉ. अरुण पंधरकर, डॉ. बाळासाहेब सागडे, डॉ. संजय कळमकर, सिनेट सदस्य शिवाजी साबळे यांचा सन्मान केला. तसेच झावरे यांना आदर्श प्राचार्य म्हणून गौरविण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, माजी नगरसेवक विजय गव्हाळे, राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, कार्याध्यक्ष विशाल म्हस्के, गणेश बोरुडे, गौरव विधाते, प्रसाद कर्नावट, महाविद्यालयाचे रजिस्टार बबन साबळे, सेवक कल्याण संचालक दादा आगळे, रवी वर्पे, अजित निमसे, महादेव चेमटे, प्रशांत घोडके, मनोज पवार, वैभव घोडके, यशवंत तोडमल आदी उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, न्यू आर्टस महाविद्यालयाचा शहर व जिल्ह्याच्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान राहिले आहे.महाविद्यालयाने गुणवत्तेची एक वेगळी ओळख निर्माण केली.स्वायत्त दर्जाने महाविद्यालयाला विद्यापिठा सारखे महत्त्व प्राप्त झाले आहे. ही जिल्ह्याच्या व शहराच्या दृष्टीने गौरवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा.माणिक विधाते यांनी गुणवत्तेबाबत न्यू आर्टस महाविद्यालय अग्रेसर राहिले असून,या महाविद्यालयास स्वायत्त दर्जा मिळणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने देखील भविष्य घडविण्याची संधी निर्माण झाली आहे.काळाची गरज ओळखून महाविद्यालयास नव-नवीन व व्यावसायाभिमुख अभ्यासक्रम सुरु करता येणार आहे. विद्यापिठाचे अधिकार महाविद्यालयाला मिळाल्याने, याचा फायदा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे यांनी महाविद्यालयास स्वायतत्ता मिळाल्यामुळे यापुढे महाविद्यालयास पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणे, नवीन अभ्यासक्रम सुरु करणे, मूल्यांकनाच्या पध्दती ठरवणे, परीक्षा घेणे, निकाल जाहीर करण्याचा अधिकार मिळाला आहे.

पूर्वी या कामासाठी महाविद्यालयास विद्यापिठावर अवलंबून रहावे लागत होते. यामुळे वेळ वाचणार असून, नवनवीन व व्यावसायाभिमुख अभ्यासक्रम देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देता येणार आहे. तसेच कालसुसंगत बदल करुन विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यास प्रयत्नशील राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!