हजारो मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर केली सामुदायिक नमाज अदा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

शहरात रमजान ईद उत्साहात साजरी

हजारो मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर केली सामुदायिक नमाज अदा

सामाजिक एकोपा, देशाच्या समृध्दी व शांततेसाठी अल्लाह चरणी प्रार्थना

पॅलेस्टाईन आणि वेढलेल्या गाझा पट्टीतील रहिवाशांचे दु:ख कमी करण्यासाठी देखील केली प्रार्थना

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात रमजान ईद (ईद-उल-फित्र) गुरुवारी (दि.11 एप्रिल) उत्साहात व शांततेत पार पडली. सकाळी 10 वाजता ईदची सामुदायिक नमाज कोठला येथील ईदगाह मैदानात अदा करण्यात आली. मौलाना नदिम अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करण्यात आले. रखरखत्या उन्हातही नमाजसाठी शहरातील मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

रमजान महिन्याच्या 30 उपवासनंतर बुधवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्याने गुरुवारी ईद सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध भागातील मशिदमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून ईदच्या नमाजची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक मशिदमध्ये मुस्लिम भाविकांनी नमाज अदा केली.

ईदगाहच्या सामुदायिक नमाजनंतर सामाजिक एकोपा, देशाच्या समृध्दी व शांततेसाठी अल्लाह चरणी प्रार्थना करण्यात आली. विशेषत: पॅलेस्टाईन आणि वेढलेल्या गाझा पट्टीतील रहिवाशांचे दु:ख कमी करण्यासाठी व त्यांच्या संरक्षणासाठी सामूहिक दुआ करण्यात आली. तर युवकांनी पॅलेस्टाईनवर होणारे अमानुष हल्ल्याचा निषेध करण्यासाठी व या देशाला स्वतंत्र दर्जा देण्याच्या समर्थनार्थ शर्टवर बॅच लावले होते.

ईद शांततेत होण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने ईदगाह मैदान व शहरातील विविध भागात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोठला येथून जाणारी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली होती. नमाजनंतर शहरातील विविध कब्रस्तान व दर्गामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. घरोघरी शीरखुर्मा, गुलगुले व बिर्याणीचा बेत होता. शहरात दिवसभर मुस्लिम बांधवांसह इतर समाजबांधवांनी एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा देत होते. ईदनिमित्त शहरात सामाजिक एकतेचे दर्शनही घडले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!