अहमदनगर प्रतिनिधी-धकाधकीच्या जीवनामध्ये मनुष्य आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असतो. वय वाढल्यानंतर विविध आजारांना सामोरे जावे लागते. यावेळी डोळ्याचे विविध आजार निर्माण होत आसतात. घरातही वयोवृद्धांच्या आजारपणाकडे दुर्लक्ष केले जाते.आरोग्य सुविधाही दिवसेंदिवस महागडी सेवा होत चाललेले आहे. त्यामुळे गोरगरीब जनता आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असतात. यासाठी मोफत आरोग्य शिबिराची खरी गरज आहे. या मोफत शिबिरातून आपल्या आरोग्याची तपासणी करून विविध आजारांवरती योग्य ते उपचार करून निदान करता येते.बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले गेले पंचवीस ते तीस वर्षापासून सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करत आहे. या कोरोना च्या काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांना डोळ्याचे विविध आजार निर्माण झाले होते.कोरोना काळात त्यांना उपचार घेणे शक्य नव्हते. यासाठी दरेवाडी जिल्हा परिषद गटातील नागरिकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून आपले कर्तव्य बजावण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
दरेवाडी जिल्हा परिषद गटातील नागरिकांसाठी मोफत मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले मित्र मंडळ व के.के आय बुधरानी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते. यावेळी मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिघे,खरेदी-विक्री संघाचे सभापती सुरेश सुंबे,उपसभापती संतोष महस्के. बाबासाहेब खर्से,बबन आव्हाड,बाळासाहेब निमसे,संदीप कर्डिले,मुरलीधर गोरे,रावसाहेब मोडवे,संदीप राहिज,अंकुश गवळी,माणिक गवळी,मंगळ गवळी,स्वाती बेरड,हभप अमोल जाधव जगन्नाथ मोडवे,आदिनाथ मोडवे, दिलीप भालसिंग, रेवननाथ चोभे,संतोष कुलट,दिपक कारले,बापूसाहेब कुलट,खंडू काळे,अर्चना कुलट आदी उपस्थित होते.
हरीभाऊ कर्डिले म्हणाले की, मोफत सर्वरोग निदान शिबिरातून सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचे प्रश्न मार्गी लागतात. आजारावर योग्य निदान होण्यासाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करणे गरजेचे आहे.त्यामुळे डॉक्टरांना आजारावरती योग्य निदान करता येते. मोठ्या प्रमाणात डोळ्याचे आजार असणारे रुग्ण आढळून येत आहे. त्यांना उपचार घेण्यासाठी दरेवाडी गटामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये सुमारे 300 रुग्णानाची तपासणी करण्यात आली असून 97 रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.