- Advertisement -
अहमदनगर (प्रतिनिधी)- पिंपरी जलसेन (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील हरिभाऊ भागुजी थोरात (वय 68 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते मुंबई येथे क्रेन यांत्रिक म्हणून कार्यरत होते. सामाजिक, धार्मिक, क्षेत्रातील योगदानामुळे तेथे गावात व कामाच्या ठिकाणी सर्वांना परिचित होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे. ते सैनिक बँकेचे चेअरमन कारभु थोरात व पिंपरी जलसेनचे माजी सरपंच लहू थोरात यांचे बंधू होत.
- Advertisement -