हर दिन मॉर्निंग ग्रुपचे वृक्षारोपणाने जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

स्थिर निरोगी वातावरणासाठी निसर्ग संवर्धन मानवी समाजाचा पाया -संजय सपकाळ

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- हर दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने जागतिक निसर्ग संवर्धन दिन वृक्षारोपण अभियानाने साजरा करण्यात आला. भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध प्रकारचे झाडे लावून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन कस्तुरे, मेजर दिलीप ठोकळ, रमेशराव वराडे, दिलीप गुगळे, विकास भिंगारदिवे, सर्वेश सपकाळ, दीपक बडदे, सरदारसिंग परदेशी, नामदेवराव जावळे, अभिजीत सपकाळ, बाबासाहेब बेरड, सुमेश केदारे, रामनाथ गर्जे, सिताराम परदेशी, विठ्ठल राहिंज, दिनेश शहापूरकर, किशोर भगवाने, शरद धाडगे, अशोकराव भगवाने, विकास निमसे, विलास तोतरे, विश्‍वास वाघस्कर, राजू शेख, सुरेश कानडे, सौरभ रासने, गणेश माळगे, भाऊसाहेब कराळे, किरण फुलारी, योगेश चौधरी, अनंत सदलापूर, विशाल भामरे, संजय वाकचौरे, संतोष लुनिया, रमेश कोठारी आदी उपस्थित होते.

संजय सपकाळ म्हणाले की, मानवाने आपल्या सुख सोयीसोयींसाठी निसर्गाचे शोषण करुन त्याची मोठी हानी केली. हा दिवस निसर्ग संवर्धन करण्याचा संकल्प आहे. निसर्गाचे आपल्या परिने कसे संवर्धन करता येईल यासाठी एक पाऊल उचलणे गरजेचे बनले आहे.जागतिक निसर्ग संरक्षण दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश पृथ्वीवरील नैसर्गिक वातावरणापासून नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या प्राणी व झाडांचे यांचे संवर्धन करणे होय.

स्थिर निरोगी वातावरणासाठी निसर्ग संवर्धन मानवी समाजाचा पाया बनला आहे. आजची जागतिक स्तिथी बघता मानव जातीने नैसर्गिक संसाधने जपून वापरायलाच हवीत.आज आपण ही संसाधने जपून वापरली नाहीत किंवा त्यांचे योग्यरित्या संवर्धन केले नाही, तर आपल्याच पुढच्या पिढीला याचा वापर करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!