२७ सप्टेंबर रोजीचा भारत बंद यशस्वी करण्यासाठी शेतकर्‍यांना एकजुटीची हाक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

शेतकरी संवाद यात्रेनिमित्त शहरात शेतकरी मेळावा

शेतकर्‍यांच्या एकजुटीच्या लढ्यापुढे सरकारला माघार घ्यावीच लागणार  –  कॉ.सुखदर्शनसिंग नठ

अहमदनगर (प्रतिनिधी) – वाजिद शेख

जोपर्यंत शेतकरी विरोधी तीन कायदे मागे घेतले जाणार नाही, तोपर्यंत माघार नाही. शेतकर्‍यांच्या एकजुटीच्या लढ्यापुढे सरकारला माघार घ्यावीच लागणार असल्याचा विश्‍वास दिल्ली येथील टिकरी बॉर्डरवर शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे पंजाब किसान युनियनचे उपाध्यक्ष कॉ.सुखदर्शनसिंग नठ यांनी व्यक्त केला. तर देशाची अर्थव्यवस्था उणे 20 खाली गेलेली असतानाही फक्त शेती मुळे ही अर्थव्यवस्था टिकून आहे. 50 टक्के पेक्षा जास्त लोकांची उपजीविका ही शेतीवर चालत आहे. मात्र मुठभर भांडवलदारांच्या हितापोटी शेतकर्‍यांनाच देशोधडीस लावण्याचे कार्य भाजप सरकार करीत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

श्रमिक शेतकरी संघटना-सत्यशोधक शेतकरी सभा व अखिल भारतीय किसान महासभा यांच्या वतीने राज्यभर केंद्र सरकारच्या लोकशाही आणि संविधान विरोधी तीन कृषी कायदेविरोधात सुरू असलेल्या शेतकरी संवाद यात्रे दरम्यान शहरातील टिळक रोड येथील श्रमिक कार्यालयात झालेल्या शेतकरी मेळाव्यात कॉ. सुखदर्शनसिंग बोलत होते. यावेळी बिहार येथील भाकपचे आमदार कॉ. सुदामा प्रसाद, अ. भा. किसान महासभेचे राष्ट्रीय सचिव कॉ. राजाराम सिंग, कॉ. राजेंद्र बावके, कॉ. किशोर ढमाले, कॉ. सुभाष काकुस्ते, कॉ. आनंद वायकर, कॉ. अनंत लोखंडे, कॉ. जीवन सुरूडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कॉ. राजाराम सिंग म्हणाले की, कॉर्पोरेट घराण्यांच्या घरणेशाहीला भाजपा सरकारचा पाठींबा आहे. आधी अदानी-अंबानी ने कंपन्या बनवल्या , गोडाऊन तयार केले व त्या नंतर हे सर्व कायदे त्यांच्या भल्याकरता त्यांना विचारून बनवण्यात आले.यातून शेतकर्‍यांचे तसेच जनतेचे मोठे नुकसान होणार आहे.आत्ता फक्त पेट्रोल-डिझेल च्या किंमती वाढत आहेत, शेती जेव्हा कॉर्पोरेट च्या हातात जाईल तेव्हा अन्नधान्याचे दर वाढण्याची भिती त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविक कॉ. सुभाष काकुस्ते यांनी दि.२७ सप्टेंबर रोजी देशव्यापी भारत बंदची हाक देण्यात आली असून, या मेळाव्याच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना या बंद मध्ये सहभागी व्हावे. विविध राज्यातील शेतकर्‍यांना संघटित करणे आणि सर्वसामान्य जनतेमध्ये शेतकरी कायद्यांविषयी असलेले समज, गैरसमज दूर व्हावेत यादृष्टीने श्रमिक शेतकरी संघटनेतर्फे शेतकरी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद पासून शेतकर्‍यांच्या मेळाव्याने संवाद यात्रेची सुरुवात झालेली आहे. हे आंदोलन फक्त पंजाब आणि हरियाणातल्या शेतकर्‍यांचे नसून संपूर्ण भारतातील शेतकरी संघटित होत आहे. विरोधाभास म्हणजे आरएसएस प्रणित भारतीय किसान संघाने देखील या कायदयांना विरोध केला आहे. मोदी-शहा च्या मर्जीने अदानी-अंबानी करता चालणारे सरकार हे कायदे मागे घ्यायला तयार नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार कॉ. सुदामा प्रसाद, कॉ किशोर ढमाले यांची भाषणे झाली. पाहुण्यांचे स्वागत स्वागत कॉ. आनंदराव वायकर यांनी केले. आभार कॉ. अनंत लोखंडे यांनी मानले.
—————————
अहमदनगर महापालिका कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ संलग्न सर्व संघटना 27 सप्टेंबरच्या भारत बंदमध्ये सहभागी होणार.
—————————

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!