२ दिवसांपासून कुत्रीच्या तोंडात अडकलेल्या प्लॅस्टिक बरणीला काढायला लागले २ तास !     

0
119

अहमदनगर प्रतिनिधी – विजय मते

पाईपलाईन रोडवरील समर्थ नगर येथील एका कुत्रीच्या तोंडात दोन दिवसापासून अडकलेल्या प्लास्टिक बरणीला काढायला लागले दोन तास याबाबतची माहिती अशी की समर्थ नगर येथील एका कुत्रीने चार पिलांना जन्म दिला स्वतःच्या पोटाची खळगी भरून पिलांसाठी दूध देण्यासाठी भटकंती करत असताना एका प्लास्टिकच्या बरणीत तिचे तोंड अडकले दोन दिवस झाले तरी प्लास्टिक बरणी तोंडातून बाहेर निघेना अखेर राजेंद्र गर्गे यांच्या लक्षात ही गोष्ट आली.

रविवारी सकाळी या प्रभागाचे माजी नगरसेवक निखिल वारे यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती दिली.श्री वारे यांनी क्षणाचाही विलंब न करता महानगरपालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे यांना ही माहिती दिली.श्री डांगे यांनी मनपाच्या कर्मचाऱ्यांना कळविले.श्री वारे यांनी प्राणीमित्र हर्षद कटारिया,संकेत भापकर यांना बोलावून घेतले मनपा कर्मचारी प्राणीमित्र यांनी एकत्रितपणे प्रयत्न करत २ तासाने ती बरणी कात्रीने कापून कुत्रीचे तोंड मोकळे केले.

वारे यांनी कुत्रीला पाणी पाजून खायला दिले पिल्लांना पाहताच तिला मायेचा पाझर फुटला अन पिलाजवळ जाऊन ती शांतपणे बसली या मुक्या प्राण्याला जीवदान दिल्या बद्दल नागरिकांनी वारे यांच्या सह प्राणीमित्र कटारिया भापकर यांना धन्यवाद दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here