जिल्ह्यात २५ सप्टेबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी – जिल्हयातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवार, दि. २५ सप्टेबर, २०२१ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये कोरोना नियमावलीचे पालन करुन अधिकाधिक पक्षकारांनी सहभागी होउन न्यायालयात दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश, तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या.सुधाकर यार्लगड्डा यांनी केले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार आयोजित या राष्ट्रीय लोक अदालतीत दाखल पूर्व आणि प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. ही लोकअदालतीचे आभासी पध्दतीद्वारे देखील आयोजन करण्यात आलेले आहे, त्यानुसार बरीच प्रकरणे आभासी
पध्दतीने हाताळण्यात येतील, तसेच प्रत्यक्ष उपस्थित होणा-या लोकअदालतमध्ये देखील ब-याच पक्षकारांना उपस्थित राहण्याबाबत आभासी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे.

अहमदनगर जिल्हा मुख्यालयासह जिल्हयातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयामध्ये घेण्यात येत असलेल्या या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील दिवाणी, फौजदारी, एन. आय. ॲक्टची प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार
कायदयाखालील प्रकरणे, कौटुंबिक वादांची प्रकरणे, इलेक्ट्रीसिटी ॲक्टची समझोता प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. पक्षकारांनी ही प्रकरणे आपसी समझोत्याकरीता ठेवून ती सामंजस्याने सोडविण्याबाबतचे आवाहन न्या. यार्लगड्डा आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव रेवती देशपांडे यांनी केले आहे.

ज्या नागरिकांना आपली प्रकरणे सदर लोक अदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा नगर न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कार्यालय किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!