शिक्षकांमध्ये जग बदलण्याची ताकद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- Advertisement -

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे वितरण

मुंबई,

विद्यार्थ्यांना आयुष्याची दिशा दाखविण्यात शिक्षकांचे समर्पण, मार्गदर्शन आणि योगदान महत्त्वाचे असून त्यांच्यामध्ये जग बदलण्याची ताकद असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. महाराष्ट्र विविध क्षेत्रात देशात क्रमांक एकवर आहे. शिक्षण क्षेत्रातही अग्रेसर राहण्यासाठी आपण निर्धार करुया, असे आवाहन त्यांनी केले.

सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांना आज मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. एनसीपीए येथील टाटा सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय ए कुंदन, शालेय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, शिक्षक आमदार किरण सरनाईक, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी संभाजी  थोरात आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. मंत्री श्री.केसरकर यांच्या कार्यकाळातील निर्णयांचे संकलन असलेल्या कार्यअहवालाचे तसेच बालभारतीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज स्मृती ग्रंथाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री म्हणाले, शिक्षकांच्या योगदानाशिवाय देश प्रगतीपथावर जाऊ शकत नाही, यामुळेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात राज्याला अग्रेसर राखण्यासाठी नवनवीन कल्पनांना शासनाने नेहमीच पाठबळ दिले आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्याची जोडही आवश्यक असल्याने नवीन शिक्षण पद्धती अवलंबण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आयुष्यात मोठी उंची गाठणे शक्य होईल आणि या कामी योग्य वेळी योग्य दिशा दाखवण्याचे काम शिक्षक करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या माध्यमातून तीन जागतिक विक्रम प्रस्थापित झाले आहेत. आदर्श शाळा विद्यार्थ्यांना जगण्याचा मंत्र शिकवित असल्याने आदर्श शाळा घडविण्यामध्ये शिक्षकांची भूमिका मोलाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रात देशात पहिल्या क्रमांकाकडे झेप घेण्यामध्ये शासकीय शाळांचा मोठा वाटा असल्याचे सांगून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न आस्थेवाईकपणे सोडविण्यात येतील असेही ते म्हणाले. आपल्या किसननगर येथील शाळेच्या आठवणी जागवून आपल्या प्रगतीमध्ये शिक्षक रघुनाथ परब यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. इमारतींपेक्षा शिक्षकांवरून शाळेचे महत्त्व ठरते असे सांगून खडू आणि छडीच्या जोरावर आयुष्याची शिडी चढण्यास शिकविणाऱ्या शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन केले.

ॲड.नार्वेकर म्हणाले, ‘वाचाल तर वाचाल’ असे नेहमी म्हटले जाते. परंतु जो वाचायला शिकवतो तो समाज घडवतो, यामुळे चांगला समाज घडविण्यामध्ये शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे. शासनाने शिक्षण क्षेत्राला प्राधान्य दिले असून देशाला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी अग्रेसर होण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

 

गुणवंत महाराष्ट्र घडविणार – दीपक केसरकर

महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा वाढून गुणवंत महाराष्ट्र घडविण्यात शिक्षकांचे योगदान मोलाचे असणार आहे. यासाठी शासनामार्फत विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येत असल्याचे सांगून मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी शालेय शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले, शिक्षकांसाठी टप्पा अनुदान लागू करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे. डिसेंबर ऐवजी जून महिन्यापासून हा टप्पा लागू करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच निर्णय घेण्यात येईल. शिक्षक भरतीला सुरूवात करून पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. ग्रंथपाल, शिक्षण सेवक यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात आले आहेत. शिक्षकांच्या निवृत्ती वेतनाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून त्यांना यापुढे निवडणूक आणि जनगणनेव्यतिरिक्त अशैक्षणिक कामे देण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, शासनाने सर्व विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला आहे. आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट आणि सॉक्स देण्याचा निर्णय घेण्यात आला. पोषण आहारात अंडी, केळी, तृणधान्य देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा तसेच शेतीची माहिती व्हावी यासाठी परसबाग योजना राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यात आले. व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात येत असून जर्मनीमध्ये रोजगारासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महावाचन उत्सव अभियानाअंतर्गत एक लाख शाळा आणि एक कोटी विद्यार्थी सहभागी होतील असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

श्रीमती कुंदन मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, शिक्षक हे समाजाचे आधारस्तंभ आहेत. आज आपण १०९  शिक्षकांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करीत आहोत. राज्यातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला, ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून शालेय शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमात शिक्षक हे नेहमीच स्वयंस्फूर्तीने काम करतात, त्यांना वेळोवेळी येणाऱ्या अडचणीही विभागामार्फत सोडविण्याचे काम केले जात असल्याचे त्या म्हणाल्या.

श्री.मांढरे यांनी प्रास्ताविकाद्वारे शिक्षक पुरस्काराविषयी माहिती दिली. शिक्षक कधीच माजी होत नाहीत. ते विद्यार्थ्यांसाठी कायम माझे शिक्षकच राहतात, असे त्यांनी सांगितले. अनेक शिक्षकांनी विविध क्षेत्रात विक्रम प्रस्थापित केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांना प्रवर्गनिहाय प्राथमिक- ३८, माध्यमिक- ३९, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक)- १९, थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार- ८, विशेष शिक्षक कला/क्रीडा (१+१)- २, दिव्यांग शिक्षक / दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक- १, स्काऊट/गाईड (१+१)-२ अशा एकूण १०९ शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सन 2023-24 चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारार्थी शिक्षकांची यादी

प्राथमिक शिक्षक

श्रीमती सविता संदीप जगताप, गोवंडी, मुंबई; श्रीमती आशा अशोक ब्राम्हणे, मालाड (पश्चिम) मुंबई; श्रीमती पूर्वा प्रविण संखे, मालाड पश्चिम, मुंबई; लक्ष्मण महादेव घागस, शिरवली, ता.मुरबाड, जि.ठाणे; सचिन परशुराम दरेकर, गोळेगणी ता. पोलादपूर, जि.रायगड; श्रीमती शिल्पा बळवंत वनमाळी सावते, ता. डहाणू, जि.पालघर; सचिन शिवाजीराव बेंडभर, वाबळेवाडी, ता.शिरुर, जि.पुणे; श्रीमती पल्लवी रमेश शिरोडे, कोंढवे धावडे, ता.हवेली, जि.पुणे; श्रीमती शुभांगी भाऊसाहेब शेलार, शेवगाव जि. अहमदनगर; राहुल काशिनाथ सुरवसे, गुळवंची, ता.उत्तर सोलापूर, जि.सोलापूर; प्रदीप अमृत देवरे, बोकडदरे, ता.निफाड, जि.नाशिक; कैलास गोविंदा वाघ, खलाणे, ता.शिंदखेडा, जि.धुळे; रविंद्र भाईदास पाटील, प्रकाशा, ता.शहादा, जि.नंदुरबार; संदीप जगन्नाथ पाटील, ढालगाव, ता.जामनेर, जि.जळगाव; श्रीमती पुष्पा सुभाष गायकवाड, जरगनगर, कोल्हापूर; रुपेश लक्ष्मण जाधव, निगडी, ता.कोरेगाव, जि.सातारा; अमोल किसन हंकारे, कुची, ता.कवठे महांकाळ, जि.सांगली; सुभाष भाऊ चोपडे, करक नं. 1, ता.राजापूर, जि.रत्नागिरी; जक्कापा दशरथ पाटील, बांदा नं.1, ता.सावंतवाडी, सिंधुदुर्ग; श्रीमती वर्षा बाबुराव देशमुख, सातारा, ता.जि.छत्रपती संभाजीनगर; डॉ. गोधाजी सोपानराव कापसे, झिरपी तांडा, वसंतनगर, केंद्र झिरपी, ता.अंबड, जि.जालना; श्रीमती जया किसन इगे, मलनाथपूर केंद्र मोहा, ता.परळी, जि.बीड; रामकिशन सदाशिवराव भोसले, बोरवंड बु. ता.जि.परभणी; गजानन कोंडिबा चौधरी, पारडी खुर्द, ता.वसमत, जि.हिंगोली; डॉ. स्मिता विजय मामीलवाड, माणुसमारवाडी, ता.रेणापूर, जि.लातूर; मिलिंद पुंडलिकराव जाधव, भोकर, ता.भोकर, जि.नांदेड; बळीराम सुधाकर घोरवाडे, मुळज, ता.उमरगा, जि.धाराशिव; श्रीमती ज्योती त्र्यंबकराव कोहळे, नागपूर, जि.नागपूर; कैलास प्रताप चव्हाण, सोरना, ता.तुमसर जि.भंडारा; दिनेशकुमार रामदास अंबादे, गोरेगाव, जि. गोंदिया; श्रीमती मालती भास्कर सेमले, मोखाळा, ता.सावली, जि.चंद्रपूर; आशिष अशोक येल्लेवार, नवेगाव, ता.चामोर्शी, जि.गडचिरोली; श्रीमती दिपाली सतिश सावंत, शेकापूर (बाई) ता.हिंगणघाट,  जि.वर्धा; श्रीकृष्ण चंदू चव्हाण, कासारखेडा (हिं) धामणगाव रेल्वे, जि.अमरावती; श्रीमती मनिषा मधुसुदन शेजोळे, पाचमोरी, पो.सुकोडा, ता.जि.अकोला; श्रीमती मिनाबाई पांडुरंग नागराळे, कोकलगाव, ता.जि.वाशिम; श्रीमती मिनाक्षी अशोकराव सरदेशमुख, पाडळी आयएसओ, ता.जि.बुलढाणा;  विजय उत्तमराव वाघ, बटबोरी, ता.कळंब, जि.यवतमाळ.

माध्यमिक शिक्षक

श्रीमती स्मिता नंदकिशोर शिपूरकर, कुर्ला, मुंबई; श्रीमती पौर्णिमा सचिन माने, परेल, मुंबई; रजनीकांत रुपशंकर भट्ट, अंधेरी (प) मुंबई; श्रीमती अरुणा निखिल पंड्या, अंधेरी (प) मुंबई; मनोज शालीग्राम महाजन, ठाणे; श्रीमती रंजना दिलीप देशमुख, कर्जत, जिल्हा रायगड;  रामकृष्ण राजाराम पाटील, कासा, ता. डहाणू, जि. पालघर; डॉ.सुनिता विश्वेश्वर सपाटे, पुणे, जि. पुणे; रावसाहेब मधुकर चौधरी, आळंदे, ता. भोर, जि. पुणे; उमेश गोपीनाथ घेवरीकर, शेवगांव, ता. शेवगांव, जि. अहमदनगर; तात्यासाहेब शिवाजी काटकर, अकलूज, ता.माळशिरस, जि. सोलापूर; किरण रामगिर बावा, दाभाडी, ता. मालेगांव, जि. नाशिक; अविनाश काशिनाथ पाटील, वलवाडी, ता. जिल्हा धुळे; उमेश अशोक शिंदे, नंदूरबार, जि. नंदूरबार; श्रीमती अश्विनी योगेश कोळी, न्हावी, ता. यावल, जि. जळगाव; सागर पांडुरंग वातकर, कोल्हापूर, जि. कोल्हापूर; प्रमोद रमेश राऊत, औध, ता. खटाव, जि. सातारा; विठ्ठल महादेव मोहिते, हरीपूर, ता. मिरज , जिल्हा सांगली; डॉ. महादेव साताप्पा खोत, जामगे, ता. खेड, जि. रत्नागिरी; आनंदा लक्ष्मण बामणीकर, दोडामार्ग, ता. दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग; डॉ. जिजा नारायण शिंदे, छत्रपती संभाजी नगर, जि. छत्रपती संभाजी नगर; डॉ. शिवनंदा उमाजीराव मेहेत्रे,  जालना, ता.जिल्हा जालना; श्रीमती पद्मजा शरदराव हम्पे, चौसाळा, ता. जिल्हा बीड; सुमित मधुकरराव लांडे, वाघाळा, ता. पाथरी, जि. परभणी; प्रविण गोपाळराव शेळके, वसमत, ता. वसमत, जि. हिंगोली; श्रीमती अनिता मारोतीराव खडके, भादा, ता.औसा, जिल्हा लातूर; डॉ. प्रज्ञानकुमार पुरुषोत्तमराव भोजनकर, अर्धापूर, ता. अर्धापूर, जि. नांदेड; रामकृष्ण व्यंकटराव पाटील, जेवळी एन, ता. लोहारा, जिल्हा धाराशिव; उल्हास वामनराव इटानकर, देवलापार, ता. रामटेक, जि. नागपूर; विलास भिवराज लांजेवार, एकोडी, ता. साकोली, जि. भंडारा;  घनश्याम देवचंद पटले, कालीमाटी, ता.आमगांव, जि. गोंदिया; धर्मराज रामकृष्ण काळे, गडचांदूर, ता. कोरपना, जि. चंद्रपूर; श्रीमती संध्या शेषराव येलेकर, गडचिरोली, ता. जि. गडचिरोली; डॉ. गिरीश  विठ्ठलराव वैद्य, वर्धा, ता. जि. वर्धा; शरद वसंतराव गढीकर, कुंड सर्जापूर, ता.जि. अमरावती; आनंद विठ्ठलराव साधू, अकोला, ता.जि.अकोला; शरद दत्तराव देशमुख, वाशिम, ता.जि. वाशिम; संजय रामचंद्र सावळे, शेलापूर, ता. मोताळा,  जिल्हा बुलढाणा; वैभव भैय्यासाहेब जगताप, नेर, ता. नेर, जि. यवतमाळ

आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक)

सुधीर पुंडलिक भोईर, रातांधळे, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे; सचिन परशराम शिंदे,   पोशीर, ता. कर्जत, जिल्हा रायगड; रविंद्र मंगीलाल जाधव, रणकोळ, ता. डहाणू, जिल्हा पालघर; श्रीमती अलका सुनिल उंडे, आमोंडी, ता. आंबेगाव, जिल्हा पुणे; श्रीमती पुष्पा शिवराम लांडे,  शिळवंडी, ता. अकोले, जिल्हा अहमदनगर; खंडू नानाजी मोरे, खामखेडा, ता. देवळा, जिल्हा नाशिक; गुलाब रमाजी दातीर, माळेगाव काजी, ता.दिंडोरी, जिल्हा नाशिक; उमाकांत हिरालाल गुरव, मोहिदा, पोस्ट पळासनेर, ता. शिरपूर, जिल्हा धुळे; ओमशेखर वैजिनाथ काळा, पाचोराबारी, ता. जिल्हा नंदुरबार; श्रीमती सपना सयाजीराव हिरे, अंबापूर, ता. जिल्हा नंदुरबार; दिलीप श्रावण पाटील, आभोडा बुद्रुक, ता. रावेर, जिल्हा जळगाव; श्रीमती मीरा गोविंदराव परोडवाड, करंजी, ता. माहूर, जिल्हा नांदेड; घनश्याम झाडूजी सर्याम, झिंजेरिया पोस्ट देवलापार, ता. रामटेक, जिल्हा नागपूर; संदीप ईश्वरदास तिडके, सावली, ता.देवरी, जिल्हा गोंदिया; श्रीकांत गटय्या काटेलवार, वाळवी, केंद्र गट्टा, ता.एटापल्ली, जिल्हा गडचिरोली; जितेंद्र गाविंदा रायपुरे, धानोरा, जिल्हा गडचिरोली; प्रमोद रमेशराव दखने, चिचखेडा, ता. चिखलदरा, जिल्हा अमरावती; विलास कवडुजी राठोड, हिवरा बा. केंद्र शिबला, पंचायत समिती झरी जामणी, जिल्हा यवतमाळ;

थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार

श्रीमती गौरी राजेंद्रकुमार शिंदे, गोरेगाव पूर्व, मुंबई; श्रीमती सुनिता भाऊसाहेब इंगळे, कोपरगाव, ता. कोपरगाव, जिल्हा अहमदनगर; श्रीमती दिपाली सुकलाल आहिरे, नाशिक; श्रीमती अंजली शशिकांत गोडसे, बिरामणेवाडी, ता. जावली, जिल्हा सातारा; श्रीमती रत्नमाला एकनाथ शेळके,  पोरजवळा, केंद्र पिंगळी, ता. जिल्हा परभणी; श्रीमती सुनंदा मधुकर निर्मले, बेलवाडी, ता.लोहारा, जिल्हा धाराशिव; श्रीमती सुलक्षणा प्रमोद गायकवाड, मोहाळा (रै), पंचायत समिती पोंभुर्णा, जिल्हा चंद्रपूर; श्रीमती सुनिता शालीग्रामजी लहाने, वाढोणा, पोस्ट खैरी, ता. अचलपूर, जिल्हा अमरावती;

विशेष शिक्षक (कला) – राजेश भिमराज सावंत, नाशिक;

विशेष शिक्षक (क्रीडा) – श्रीमती नीता अनिल जाधव, घाटकोपर पूर्व, मुंबई;

दिव्यांग शिक्षक / दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक – संतोष मंगरु मेश्राम, खराळपेठ, ता.गोंडपिपरी, जिल्हा चंद्रपूर;

स्काऊट शिक्षक – भालेकर सुखदेव विष्णू, चव्हाणवाडी, पोस्ट काटगाव, ता. तुळजापूर,‍ जिल्हा धाराशिव;

गाईड शिक्षक – श्रीमती शुभांगी हेमंत पांगरकर, छत्रपती संभाजीनगर;

सन 2022-23 मधील पुरस्कार – शरद गोपाळराव ढगे, पोहणा, ता.हिंगणघाट, जिल्हा वर्धा;

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!