भातोडीच्या बंधाऱ्यातील पाणी शेजाराच्या गावाना देण्यात यावे

- Advertisement -

केडगाव :- भातोडी, ता. नगर येथील बंधा-यातून सोडव्यातून जाणारे पाणी परीसरातील गावाना देण्यात यावे याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी लघुपाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियता बी.एस , वाळके यांना दिले.

नगर तालुक्यातील भातोडी ( ता. नगर ) परीसरात झालेल्या पावसामुळे बंधारा पुर्ण क्षमतेने भरला आहे .बधाऱ्यातील सांडव्यातून पाणी वाहून जात आहे. सदरचे वाहुन जाणारे पाणी कॅनॉलव्दारे सांडवा, मांडवा व दशमीगव्हाण येथील तलावात टाकून तलाव भरुन घेण्यात यावेत. सदर ठिकाणी कॅनॉलची सुविधा उपलब्ध आहे. या भागात टॅकर चालू आहे हे पाणी या गावाना दिल्यास टॅकर बंद होऊन शासनाचा पैसा हि वाचणार आहे .तरी वरीलप्रमाणे कार्यवाही केल्यास तेथील तलाव पुर्ण भरतील व शेतक-यांचा पाण्याचा प्रश्न सुटु शकेल. तरी भातोडी बंधा-याच्या सांडव्यातून जाणा-या पाण्याने सांडवा मांडवा व दशमीगव्हाण येथील तलाव भरणेत यावेत अशी निवेदनात मागणी केली आहे.

यावेळी जिवाजी लगड , अजय बोरुडे , संतोष काळे , ज्ञानदेव लगड, उध्दव कांबळे , बाबा काळे, बाळासाहेब खांदवे , रमेश खांदवे, बुऱ्हाण शेख , अमोल निक्रड उपस्थित होते .

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles