माँ साहेब मीनाताई ठाकरे यांचे शिवसेनेच्या जडण-घडणीत मोठे योगदान – महापौर रोहिणी शेंडगे

- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी – राजू खरपुडे

शिवसेनेच्या स्थापनेपासून हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीने माँ साहेब मीनाताई ठाकरे यांनी काम करुन शिवसेना वाढविण्याचे काम केले. शिवसैनिकांबरोबर महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन महिलांचे प्रश्न सोडविले. शिवसेनेच्या जडण-घडणीतही त्यांचे मोठे योगदान आहे. शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्यांबरोबर महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपण काम केले पाहिजे. आज अनेक पदावर महिलांना शिवसेनेने संधी दिली आहे. त्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरु आहे. मलाही महापौर पदाच्या मिळालेल्या संधीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असून, त्याचबरोर शिवसेना पक्ष वाढविण्याचे काम या माध्यमातून केले जाईल, असे प्रतिपादन महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांनी केले.

     माँ साहेब मिनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेनेच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महापौर रोहिणी  शेंडगे, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, अभिषेक कळमकर, संजय शेंडगे, नगरसेवक योगीराज गाडे, सचिन शिंदे, विजय पठारे, संतोष गेनप्पा, अशोक दहिफळे, गौरव ढोणे, अरुणा गोयल, आव्हाड आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी विक्रम राठोड म्हणाले, मातोश्री मीनाताई ठाकरे या शिवसेनेच्या आधारस्तंभ राहिलेल्या आहेत. त्यांनी नेहमीच शिवसैनिकांना प्रेरणा देण्याचे काम केले  पाहिजे.शिवसेना पक्ष सर्वसामान्यांपर्यंत पोहचिण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. शिवसैनिकांसाठी त्या नेहमीच दैवत राहिल्या आहेत. त्यांचे आशिर्वाद शिवसैनिकांच्या पाठिशी नेहमीच राहतील. त्याचे कार्य यापुढे असेच सुरु ठेवणे ही त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे सांगितले.

     यावेळी संभाजी कदम, अभिषेक कळमकर यांनी माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या कार्याचा गौरव केला.शेवटी अरुणा गोयल यांनी आभार मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles