अहमदनगर (प्रतिनिधी)- संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील एका वाईन शॉप चालकाने आपले दुकान चालत नाही या कारणावरून संगमनेर शहरात दुकान स्थलांतरित करण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडे अर्ज केला आहे,मिळालेल्या माहितीनुसार सदर वाईन शॉप दुकान चालक मालकांनी हा अर्ज केला असून त्यामध्ये सदरचे घारगाव येथील वाईन शॉप हे संगमनेरातील संगमनेर – अकोले रोड वरील सावतामाळी नगर व पोलीस लाईन शेजारी विठ्ठल मंदिराजवळ सुरू करण्यास परवानगी मागितली आहे.मात्र या ठिकाणी असलेले मंदिर,मशिद,धार्मिक स्थळे व पी.टी.ट. हायस्कुल बि.एड.काॅलेज, सिद्धार्थ हायस्कुल व नाईट स्कुल आणि मुलांचे निरीक्षन बालगृह व आदिवासी बोडिंग हे सर्व काहिच पावलांच्या आंतरावर आहे तर शेजारी पोलीस लाईन व सभ्य नागरिकांची वस्ती आहे धर्मादाय आयुक्तांकडून मान्यताप्राप्त या विठ्ठल मंदिरात दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात अशा ठिकाणी देशी-विदेशी वाईन शॉप घारगावात चालत नाही म्हणून परवानगी देण्यात यावी ही मागणी उचित नसल्याने येथे दुकान सुरू करण्यास नागरिकांचा तीव्र विरोध दर्शवत महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समिती व शिवसेना व नागरिकांच्या वतीने शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कन्हैयालाल कतारी (राजपूत) त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क व जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शन करून जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले यावेळी संगमनेर शिवसेना शहर प्रमुख अमर कन्हैयालाल कतारी (राजपूत) समवेत सुनीता मंडलीक, कल्पना राठोड, पूजा खिच्ची, संगीता खिच्ची, अमर मंडलीक, प्रकाश चोथवे, अमर कतारी, सुभाष भरीतकर, दत्तू कांडेकर, सनील कतारी, अमर मंडलिक, अनिल केंद्रे आदी सह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
संगमनेर शहर शिवसेनेचे शहर प्रमुख व दारूबंदी समितीचे सदस्य अमर कतारी यांनी वाईन शॉप ला तीव्र विरोध दर्शवला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे अशा नागरी वस्ती जवळ व मंदिरा त्याच्या आजूबाजूला हे दुकान नकोस अशीही मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे दरम्यान अमर कतारी यांनी उत्पादन शुल्क विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अकोले रस्त्यावर शहर हद्दीत सावतामाळी नगर येथे या परिसरात दोन धार्मिक स्थळे असून तसेच जवळच पोलीस वसाहत देखील आहे येथील परिसरात वाईन शॉप सुरु करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे संबंधितांनी अर्ज केलेला आहे मात्र तेथे वाईन शॉप सुरू झाल्यास जातीय तेढ निर्माण होऊन शहरात शांततेचा भंग होऊ शकतो परवानगी देणे नियमबाह्य असून ती दिल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे संगमनेर शहर प्रमुख महाराष्ट्र राज्यात दारूबंदी कृती समितीचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अमर कतारी यांनी दिला होता. व स्थलांतरित होणाऱ्या वाईन शॉप जवळच मंदिर मशीद शाळा-कॉलेज असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्यामुळे हा स्थलांतराचा प्रस्ताव त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली व सदर वाईन शॉपला परवानगी दिल्यास महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समिती व शिवसेना व नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.