भाजपच्या कार्यालयासमोर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

0
82

अहमदनगर प्रतिनिधी – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बद्दल अपशब्द वापरल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी कोतवाली पोलिस स्टेशन येथे ठिय्या मांडला होता. यानंतर भाजपच्या कार्यलयसमोर  केंद्रीय मंत्री  नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच त्याच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले ,प्रतिमेचे दहन करण्यात आले.

यावेळी महापौर रोहिणी शेंडगे ,शहर प्रमुख दिलीप सातपुते ,युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड ,माजी शहर प्रमुख संभाजी कदम माजी महापौर भगवान फुलसोंदर ,जेष्ठ नगरसेवक अनिल शिंदे ,नगरसेवक बाळासाहेब बोराटे ,अभिषेक कळमकर ,गणेश कवडे स्मिता अष्टेकर ,आशा निबाळकर ,संजय शेडगे ,प्रशांत गायकवाड ,दीपक खेरे ,सचिन शिंदे ,शाम नळकांडे ,संग्राम कोतकर ,अमोल येवले संतोष गेनपा ,दत्ता जाधव ,विशाल वालकर ,काका शेळके ,मृणाल भिगारदिवे ,अरुणा गोयल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here