सविता रमेश फिरोदिया प्रशाला व श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण

- Advertisement -

सविता रमेश फिरोदिया प्रशाला व श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण

विद्यार्थ्यांनी पालक व शिक्षकांच्या अपेक्षा पुर्ती करुन आपली प्रगती साधावी – सविताताई फिरोदिया

नगर – शाळेचा पहिला दिवस म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी फार महत्वाचा असतो. शाळासुरु होण्यापूर्वी आठ दिवसांपासून शाळेत जायची तयार होत असते. पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांचे दिमाखदार स्वागत होत असल्याने सर्वांमध्ये पहिल्या दिवसाचा उत्साह असतो.  पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाले असल्याने विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करुन शाळेचे, त्याचबरोबर पालकांचे नाव उंचवावे. आधुनिक तंत्रज्ञानाचाही अभ्यासात उपयोग करावा, तसेच खेळासही प्रोत्साहन द्यावे. पालक, शिक्षक हे विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशिल असतात. विद्यार्थ्यांनी पालक व शिक्षकांच्या अपेक्षा पुर्ती करुन आपली प्रगती साधावी. संस्थेच्या उपक्रमांना आपले सहकार्य राहील, असे प्रतिपादन सविताताई फिरोदिया यांनी केले.

शिशु संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया प्रशाला व श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण सविताताई फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संस्थेचे चेअरमन दिलीप गुंदेचा, व्हाईस चेअरमन दशरथ खोसे, सचिव र.धों. कासवा, मनसुखलाल पिपाडा, राजेंद्र चोपडा, एल.के.आव्हाड, साहिल फिरोदिया, मुख्याध्यापिका योगिता गांधी, माध्य. मुख्याध्यापिका कांचन गावडे, विनोद कटारिया आदि उपस्थित होते.

यावेळी बाळासाहेब बोराटे म्हणाले, कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी सरकारच्यावतीने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येत आहेत. त्याचबरोबर विविध शिष्यवृत्ती, योजना राबविण्यात येत आहे. याचा उपयोग करुन विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवावे. शिशु संगोपन संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद असेच आहेत. संस्थेला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण सर्वोतोपरि मदतीस तयार राहू, असे आश्‍वासन दिले.

राजेंद्र चोपडा म्हणाले,  शिशु संगोपन संस्थेच्या सर्व शाळांमध्ये सर्वसामान्य घरातील मुला-मुलींना चांगले शिक्षण व संस्कार देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी प्रगती होत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थीही पालकांबरोबरच विद्यालयाचे नावही चमकत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रज्ञाशोध परिक्षेत राज्यात पहिला आलेल्या चि.आरव रासकर यास सविताताई फिरोदिया व राजेंद्र चोपडा यांच्यावतीने 5100 रुपयांचे तर चेअरमन दिलीप गुंदेचा यांच्यावतीने 1100 रुपयांचे बक्षिस देण्यात आले. तसेच चि. सैफ शेख, पुष्कराज गायकवाड, धनश्री पाचारणे, स्वरा रोकडे या विद्यार्थ्यांचाही स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

प्रास्तविकात मुख्याध्यापिका योगिता गांधी यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा सादर करुन यंदाच्या वर्षी विद्यालयाच्यावतीने राबविण्यात येणार असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन श्रीराम खाडे यांनी केले तर आभार कांचन गावडे यांनी मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!