1 मे महाराष्ट्र अस्थिरोग संघटना दिवस साजरा होणार मोफत तपासणी व उपचार शिबिराने सांध्यांचे आणि हाडांच्या आरोग्यावर 7 मे पर्यंत चालणार तपासणी

- Advertisement -

1 मे महाराष्ट्र अस्थिरोग संघटना दिवस साजरा होणार मोफत तपासणी व उपचार शिबिराने
सांध्यांचे आणि हाडांच्या आरोग्यावर 7 मे पर्यंत चालणार तपासणी

एक दिवस समाजासाठी अस्थिरोग तज्ञांचा पुढाकार

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र अस्थिरोग संघटना अहमदनगर विभागाच्या वतीने 1 मे महाराष्ट्र अस्थिरोग संघटना दिवस मोफत शिबिराच्या सप्ताहाने साजरा केला जाणार आहे. सांधे वाचवा ही संकल्पना घेऊन संघटनेच्या वतीने 7 मे पर्यंत मोफत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सांध्यांचे आणि हाडांचे आरोग्य सुधारावे यासाठी शहरात विविध शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिराचा गरजूंना लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे समन्वयक डॉ. राहुल पंडित, अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. संतोष चेडे व सचिव डॉ. आशुतोष जोशी यांनी केले आहे.

या सप्ताह शिबिराचे प्रारंभ पंडित हॉस्पिटल आणि युनिय आयसीयूच्या वतीने मोफत अस्थिरोग तपासणी शिबिराने होणार आहे. या शिबिरात मोफत कॅल्शियम घनता तपासणी, संधिवात तपासणी, वृध्द नागरिकांच्या हाडांची तपासणी व फिजोथेरपी उपचार व मार्गदर्शन केले जाणार आहे. सात दिवस विविध ठिकाणी अस्थिरोग तज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या 40 वर्षापासून महाराष्ट्रातील सर्व अस्थिरोग तज्ञांची महाराष्ट्र अस्थिरोग संघटना कार्यरत आहे. 1983 साली या संघटनेचा महाराष्ट्रातील नामवंत अस्थिरोग तज्ञांनी स्थापना केली. संघटनेच्या माध्यमातून निरनिराळ्या प्रकारच्या कॉन्फरन्स, परिसंवाद, कार्यशाळा, चर्चासत्रे व मार्गदर्शन शिबिर घेतली जात आहे. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून गरजूंसाठी मोफत शिबिराचे आयोजन देखील केले जात आहे. संघटनेमुळे मोठ्या शहरांमधली व छोट्या तालुका पातळीवरच्या अस्थिरोग तज्ञांची जी दरी असायची ती महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेमुळे नाहीशी झाली. जे तंत्रज्ञान प्रगत शहरांमध्ये आहेत तेच तंत्रज्ञान व कार्यपद्धत महाराष्ट्रातील सर्व अस्थिरोग तज्ञांना अंगीकृत करता आले. त्यामुळे या उच्चतंत्रज्ञानाचा तळागाळातील जनतेला व दुर्गम भागातील समाजाला फायदा होत आहे. अस्थिरोग तज्ञांसाठी कार्य करता-करता सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून ही संघटना समाजासाठी निरनिराळे उपक्रम राबवत असल्याची माहिती महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप कोठाडिया व डॉ. अभिजीत वाहेगावकर यांनी दिली.

2018 साली डॉ. पराग संचेती यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र अस्थिरोग संघटना सप्ताह साजरा केला होता आणि तेव्हापासून हा सप्ताह मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. 1 मे या दिवशी महाराष्ट्रातील सर्व अस्थी रोग तज्ञ समाज उपयोगी प्रकल्प हाताशी घेऊन निशुल्क आणि निस्वार्थ सेवा देतात. तसेच भारतीय अस्थिरोग संघटना खांद्याला खांदा मिळवून देशभर समजपयोगी कार्य करण्यात अग्रणी आहे. यामध्ये रुग्णांची मोफत तपासणी रुग्णांची व रक्त लघवी आणि एक्स-रे अशा मोफत तपासण्या सामान्य प्रकारे केल्या जातात. काही अस्थिरोग तज्ञांकडून मोफत शस्त्रक्रिया शिबिरे घेतली जातात व काही ठिकाणी मोफत औषधे कमरेचे, मानेचे बेल्ट किंवा गुडघ्याचे बेल्ट असे वाटप केले जाते.

दरवर्षी 1 मे ते 7 मे या आठवड्या दरम्यान प्रत्येक अस्थिरोग तज्ञ त्यांच्या वेळेनुसार व परिस्थितीचा विचार करता एक दिवस समाजासाठी ही सेवा निश्‍चित देतात. काही ठिकाणी आठवडाभर वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम चालविले जातात. आठवड्याच्या उपक्रमामध्ये खेळाडूंसाठी किंवा पोलीस भरती व सैन्य भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अकॅडमी मध्ये जाऊन तपासणी व मार्गदर्शन केले जाते. रस्ते अपघात टाळण्यासाठी व अपघात झाल्यानंतर तातडीची सेवा मिळण्यासाठी ही संघटना निरंतर प्रयत्न करत असते. ॲम्बुलन्स च्या ड्रायव्हरचं ट्रेनिंग अथवा वाहतूक शाखेतील पोलिसांची ट्रेनिंग अथवा निर्णया निरनिराळ्या चौकामधील आसपासच्या लोकांमध्ये गोल्डन अवरची माहिती व अपघात झाल्यानंतर तातडीने ज्या ज्या गोष्टी करायला लागतील याचा मार्गदर्शन दिले जात असल्याची माहिती डॉ. राहुल पंडित यांनी दिली.

महाराष्ट्र अस्थिरोग संघटना दिवस निमित्त काही ठिकाणी रुग्णांना मोफत सांधे बदली शस्त्रक्रिया तर काही ठिकाणी मोफत दुर्बिणीचे सांधे शस्त्रक्रिया करण्याचा अस्थिरोग तज्ञांचा मानस आहे. कॅल्शियम तपासणी शिबिर ही बहुतेक ठिकाणी होणार असल्याचे अध्यक्ष डॉ. संतोष चेडे व सचिव डॉ. आशुतोष जोशी यांनी म्हंटले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!