माध्यमिक शिक्षक संघ व टीडीएफ आप्पासाहेब शिंदे यांच्यासाठी एकवटली

- Advertisement -

माध्यमिक शिक्षक संघ व टीडीएफ आप्पासाहेब शिंदे यांच्यासाठी एकवटली

कार्यरत शिक्षकांमधून आमदार होण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील

कार्यरत शिक्षकांमधूनच शिक्षक आमदार झाल्यास शिक्षकांची प्रश्‍न सुटणार -शिंदे

अहमदनगर (प्रतिनिधी)- नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) चा मेळावा पार पडला. यामध्ये जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष असलेले अपक्ष उमेदवार आप्पासाहेब रामराव शिंदे यांच्या पाठिशी उभे राहण्याचे जाहीर करण्यात आले. तर शिक्षकांचे प्रश्‍न सुटण्यासाठी कार्यरत शिक्षकांमधूनच शिक्षक आमदार निवडून देण्याच्या उपस्थित शिक्षकांनी निर्धार व्यक्त केला.

सावेडी येथील शुभ मंगल कार्यालयात मारुती लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीप्रसंगी सुभाष कडलग, टीडीएफचे सचिव मुश्‍ताक सय्यद, उपाध्यक्ष अमोल ठाणगे, देविदास पालवे, सुनील दानवे, राजेंद्र गव्हांदे, सहसचिव दीपक दरेकर, संजय रोकडे, सुरेश भोईटे, ताराचंद गाढवे, रमेश लांडे, दादासाहेब वांढेकर, तौसिफ शेख, बाळासाहेब मुळे, उमेश गुंजाळ, बाळासाहेब राजळे, बाळासाहेब निवडुंगे, छबुराव फुंदे, आत्माराम दहिफळे, जनार्दन सुपेकर, प्रसाद साठे, गणेश कोरे, राहुल जाधव, बबन लांडगे, संजय शिंदे, संभाजी गाडे, भानुदास तमनर, गायकवाड सर, अडसूळ सर, समाधान आरक, निवृत्ती झाडे, अण्णासाहेब माळी, भाऊसाहेब जिवडे, भरत लहाने, बापू होळकर, गणेश उघडे, भनगे सर, महेश महांडुळे, संपत ढोकणे, फय्याज शेख अनभुले सर आदींसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माध्यमिक शिक्षक संघाचे व टीडीएफच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यातून आप्पासाहेब शिंदे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भावना व्यक्त केली. मुश्‍ताक सय्यद यांनी शिक्षक संघटनेत व चळवळीत कार्यरत असणारा व प्रत्येक आंदोलनात धावून येणारा शिक्षक आमदार झाल्यास शिक्षकांचे प्रश्‍न सुटण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आप्पासाहेब शिंदे म्हणाले की, मतदार संघाच्या पाचही जिल्ह्यात शिक्षकांच्या प्रश्‍नावर अनेक वर्षापासून फिरत आहे. शिक्षकांच्या प्रत्येक आंदोलनात सहभाग व त्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. 25 वर्षात 3 हजारपेक्षा जास्त आंदोलन केली. यापुढे शिक्षकांनी उमेदवाराला किती प्रश्‍न सोडवली व शिक्षकांच्या प्रश्‍नावर किती आंदोलन केली? हे प्रश्‍न विचारण्याची गरज असल्याचे सांगितले.

संस्थाचालक, धनदांडगे व राजकारणी या मतदारसंघावर दावा करत आहे. मात्र कार्यरत शिक्षकांमधूनच शिक्षक आमदार झाल्यास शिक्षकांची प्रश्‍न सुटण्यास मदत होणार. घटनेने शिक्षकांना आमदार होण्याचा अधिकार दिला आहे. मात्र संस्थाचालक, धनदांडगे व राजकीय पुढारी या मतदारसंघात निवडून येण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. मात्र कार्यरत शिक्षकांमधूनच आमदार व्हावा ही सर्वसामान्य शिक्षकांची भावना असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

कपिल पाटील यांनी वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्त होत असल्याचे व निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. मात्र काहींना निवृत्तीनंतरही उमेदवारी करण्याचे सुचत आहे. 18 शिक्षक संघटनांची असलेली समन्वय समितीचा पाठिंबा मिळत आहे. जिल्ह्यातील 18 हजारपैकी 10 हजार मते पडली तरीही इतर जिल्ह्यातून दोन नंबरची मते मिळवून निवडून येणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles