स्वराज्य ध्वज हा राजकीय कार्यक्रम नाही येणारे सर्व आमच्यासाठी सारखेच आहेत – आ.रोहित पवार

0
97

जामखेड प्रतिनिधी – नासीर पठाण

स्वराज्य ध्वज हा राजकीय कार्यक्रम नाही येणारे सर्व आमच्यासाठी सारखेच आहेत. अनेक संतांचे व राजे महाराजांच्या वशजांचे या भुमीला पाय लागणार आहेत. सर्व जातीधर्माचे लोक या कार्यक्रमात एकत्र सहभागी होणार आहेत. त्यामुळे एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे अशी माहिती आमदार रोहित पवार यांची पत्रकारांशी बोलताना दिली.

आज दिनांक २४ रोजी सकाळी जामखेड येथे स्वराज्य ध्वजाच्या नियोजनासाठी सर्व पक्षीय बैठक पार पडली यानंतर खैरी तलावाचे भुमीपुजन करण्यात आले यानंतर खर्डा ( शिवपट्टण) किल्ला परिसराची पाहणी केली व कार्यक्रम नियोजन बैठक संपन्न झाली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह गोलेकर, दत्तराज पवार ; साकतचे सरपंच हनुमंत पाटील, संजय सस्ते, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कांबळे, महावितरणचे योगेश कासलीवाल, खर्डा परिसरातील नेते व कार्यकर्ते तसेच ग्रामसेवक प्रशांत सातपुते हजर होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार रोहित पवार यांनी सांगितले की, भारतातील नव्हे तर जगातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज यामुळे परिसराची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. हा ध्वजाचे पुजन कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात होणार आहे. १५ आॅक्टोबर रोजी या ध्वजाकडे पाहुन अनेक साधु संत व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मोठय़ा प्रमाणावर राजकीय नेतेही उपस्थित राहणार आहेत पण हा कार्यक्रम राजकीय नाही त्यामुळे येणारे सर्व जण आमच्यासाठी सारखेच आहेत.

मतदारसंघाच्या विकासासाठी व रस्त्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली व नगर सोलापूर व श्रीगोंदे जामखेड महामार्गाचा प्रश्न मार्गी लागला हे गडकरी साहेबांमुळे झाले आहे.

तसेच मी जनतेला आवाहन केले आहे की, माझ्या वाढदिवसाला केक न कापता वह्या पुस्तके द्या याला खुपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत जवळपास ऐंशी हजार वह्या पुस्तके जमा झाले आहेत. आणखी होत आहेत. अनेकांनी आपापल्या परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना ते दिले देखील आहेत.तसेच गावोगावी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येत आहेत. आतापर्यंत हजारापेक्षा जास्त रक्त पिशव्या जमा झाल्या आहेत.

सध्या कोरोना महामारी सुरू आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वांनी लस घेणे आवश्यक आहे गावोगावी लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here