कर्जत येथील मायमोर्ताब देवीच्या मूर्तीचे तुळजापूरकडे प्रस्थान

0
94

कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

कर्जत येथील मायमोर्ताब देवीला तुळजापूर मध्ये सीमोल्लंघन मिरवणुकीत अग्रभागी राहण्याचा मान असून त्यासाठी देवीची मूर्ती ने आज तुळजापूरकडे प्रस्थान केले.

सुमारे चारशे वर्षापासून ही परंपरा तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करताना देवीच्या मूर्तीच्या अग्रभागी कर्जत येथील मायमोर्ताब देवीला तुळजापूर मध्ये मान दिला जातो.मागील चारशे वर्षांपेक्षा जास्त कालावधी पासून कर्जत येथील क्षीरसगर घराण्याला हा मान दिला जातो.

मायमोर्ताब देवीचे पुजारी अंबादास शिरसागर यांनी सांगितले की वंशपरंपरेने आम्ही ही प्रथा या ठिकाणी पाळत आहोत.शिरसागर घराण्याचे मूळ पुरुष गेनुजी शिरसागर यांच्यापासून ही प्रथा सुरु झाली.आमच्या देवघरात माय मोर्तब देवी आहे.कर्जत मध्ये मिरवणूक काढून नंतर देवीचे तुळजापूर कडे प्रस्थान होते देवीची मूर्ती पितळी असून सहा फूट उंचीची आहे.

या वेळी प्रस्थान प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री राम शिंदे उपस्थित होते.यांच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत देवीची यावेळी प्रतीकात्मक मिरवणूक काढून त्यानंतर गाडी मध्येच देवीचे प्रस्थान झाले.

आराध्यांचा मेळा

कर्जत येथील मायमोर्ताब देवीचे प्रस्थान आज दुपारी बारा वाजता झाले.यावेळी आराध्यांचा मेळा याठिकाणी जमतो.देवीच्या मंदिरामध्ये महाआरती होते.त्यानंतर देवीचा पितळी मुखवटा बांधला जातो आणि त्यानंतर या मुखवट्याची मिरवणूक काढली जाते.यावेळी आराधी लोक पोत खेळतात.देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी या वेळी होत असते.परंतु यावेळी कोरोनाविषाणू यांच्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक मिरवणूक काढून त्यानंतर देवीचा मुखवटा गाडीमध्ये ठेवून त्याचे तुळजापूर कडे प्रस्थान करण्यात आले.

देवीची मूर्ती तुळजापुरला जेव्हा जाते त्या ठिकाणी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी स्वतः देवीच्या स्वागतासाठी सामोरे जातात.त्यानंतर मिरवणूकीने देवीचे तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराकडे नेण्यात येते.दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनाला प्रथम आय मुहूर्तावर देवीचा मान आहे. देवीचे पुजारी अंबादास शिरसागर व राम सुतार यांना आहे.अंबादास शिरसागर हे स्वतः देवीचा मुखवटा घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी असतात .

राम शिंदे स्वतः मिरवणुकीत सहभागी होऊन त्यांनी आराध्या यांच्याबरोबर पोत खेळला. तसेच त्यांनी नवरात्रीच्या सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here