30 वर्षांनंतर भेटणार रेसिडेन्शिअल हायस्कूलचे माजी विद्यार्थी
1994 सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा 5 मे रोजी स्नेह मेळाव्याचे आयोजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या सन 1994 दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 5 मे रोजी सकाळी 11 वाजता नगर मनमाड रोड येथील हॉटेल संजोग या ठिकाणी 30 वर्षांनी जुने मित्र-मैत्रिण एकत्र येणार असून, या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन डॉ. प्रशांत पटारे, प्रा.डॉ. विजय म्हस्के, राजेश शिंदे, विनोद बहिरवाडे, राहूल गोरे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने केले आहे.
या स्नेहमेळाच्या माध्यमातून सर्व माजी विद्यार्थी 30 वर्षानंतर एकमेकांना भेटणार आहेत. जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळणार असून, त्या काळातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींना संपर्क झाला असून, सर्व या स्नेह मेळाव्यासाठी येणार आहेत. काही वर्ग मित्रांना संपर्क झालेला नसल्याने त्या माजी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे सांगण्यात आले आहे.
या मेळाव्यात रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या सन 1994 दहावी बॅचच्या अ, ब, क व ड वर्गातील सर्व विद्यार्थी एकत्र येत आहे. या कार्यक्रमासाठी त्यावेळच्या शिक्षकांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलेले आहे. त्यांचा सुद्धा या कार्यक्रमात गौरव केला जाणार आहे. सर्वांशी संवाद, गप्पा, गोष्टी व जुन्या आठवणींना उजाळा या कार्यक्रमातून मिळणार आहे. अधिक माहितीसाठी प्रा. डॉ. विजय म्हस्के 9850648447, राजेश शिंदे 9822152615, विनोद बहिरवाडे 9423465399 व राहुल गोरे 9766927878 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.
- Advertisement -