कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कर्जत येथील प्रांताधिकारी यांच्यावर हल्ला करणारा पोलीस कर्मचारी बडतर्फ करावा,या मागणीसाठी एम आय एम संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष डॉ.अन्सार शेख व पदाधिकारी यांनी तसे निवेदन तहसीलदार कर्जत यांना आज दिले आहे .
या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की,प्रांत अधिकारी अजित थोरबोले यांच्यावर शासकीय काम करत असताना व वाळू सारखा अवैध धंदा करणाऱ्यांवर अंकुश बसवत असताना या अवैध व्यवसायामध्ये सहभागी असणाऱ्या पोलीस शिपायाने त्यांच्यावर धक्काबुक्की करून हल्ला करणे ही घटना अतिशय निंदनीय आहे.एम आय एम ही संघटना त्या पोलिस कर्मचाऱ्यांचा निषेध करत आहे.
तसेच महसूल कर्मचारी संघटनेचे आज पासून त्या पोलिस कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यासाठी व गुन्ह्यातील कलम वाढवण्यासाठी जे आंदोलन सुरू आहे त्याला संघटनेच्यावतीने आम्ही पाठिंबा देत आहोत.
सदर पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई न झाल्यास संघटनेच्या वतीने पूर्वसूचना न देता रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.