तपोवन रोडवरील आगीत भस्मसात झालेल्या दुकानदारांना मदतीचा हात

0
77
अहमदनगर प्रतिनिधी -व्यापारी व व्यावसायिक हे समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे.एकमेकांवर विविध व्यवसाय अवलंबून असतात यावरच रोजगार उपलब्ध होत असतो, कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये व्यापाऱ्यांनी व व्यवसायिकांनी एक महत्त्वाची भूमिका बजावत गरजवंतांना मदतीचा हात दिला. विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटना स्थापन करणे गरजेचे आहे.सावेडी उपनगरातील व्यापारी संघटनेने तपोवन रोडवरील नुकत्याच घडलेल्या आगीच्या दुर्घटन बाबत नुकसानग्रस्तांना मदतीचा हात दिला.मी आर्थिक मदत नव्हे तर मी माझे कर्तव्य पार पाडले आहे अशीच एकजूट अशीच जर सर्वांनी ठेवली तर उध्वस्त झालेले कुटुंब उभे राहण्यास मदत होणारच असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशनच्या वतीने तपोवन रोड वरील आगीत भस्मसात झालेल्या व्यावसायिकांना आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करताना आ.संग्राम जगताप समवेत विरोधी पक्षनेता संपत बारस्कर,अध्यक्ष पै.शिवाजी चव्हाण,उपाध्यक्ष संतोष भोजने,प्रमोद डोळसे,केतन बाफना,नंदू शिवगजे,यश शहा,मंगेश निसळ,संकेत शिंगटे,हभप खोसे महाराज,रंजना उकिरडे,शिवाजी कराळे,संतोष कल्याणकर,शेखर शिंदे, देविदास डहाळे,हरिदास नागरे, सोमनाथ कराड आदी सह व्यपारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here