सामाजिक संस्थांतील मुलांनी घेतला ‘आंबे खाण्याचा’ आस्वाद : निरंजन सेवाभावी संस्थेचा अभिनव उपक्रम
चांगल्या उपक्रमांसाठी समाज नेहमीच सहकार्य करेल – उद्योजक जितेंद्र बिहाणी
नगर – अनेक संस्था समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी काम करत आहेत. अनाथ मुला-मुलींना आधार देण्यासाठी त्यांचे भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. अशा संस्थांना मदतीचा हात देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून निरंजन सेवाभावी संस्था काम करत आहे ही कौतुकास्पद बाब आहे. आज सामाजिक संस्थांतील मुलांना आंबा खाण्याची स्पर्धेचा उपक्रम राबवून त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच विविध उपक्रमातून मदतीचा हात दिला जातो. अशा उपक्रमामुळे त्यांचा विकास होण्यास नक्कीच मदत होणार आहे. चांगल्या उपक्रमांसाठी समाज नेहमीच सहकार्य करेल. सामाजिक संस्थांच्या उन्नत्तीसाठी प्रत्येकाने आपआपल्यापरीने वाटा उचलवा, असे प्रतिपादन उद्योजक जितेंद्र बिहाणी यांनी केले.
निरंजन सेवाभावी संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे सामाजिक संस्थेतील मुलां-मुलींसाठी आंबे खाण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्योजक जितेंद्र बिहाणी, श्रद्धा बिहाणी, मर्चंटस् बँकेचे व्हाईस चेअरमन अमित मुथा, उद्योजक संजय पुगलिया, सपना आसावा, निलेश बिहाणी, शाम आसावा, गौतम मुनोत, दिनेश भाटिया, राहुल ओझा, भुषण मालू, मनिष सोमाणी, धनेश कोठारी, परेश बजाज, सुबोध काबरा, शाम भुतडा, महेश बिहाणी, निरज काबरा, योगेश बजाज आदि उपस्थित होते.
निलेश बिहाणी प्रास्तविकात म्हणाले, उन्हाळा म्हंटल की, निरंजन सेवाभावी संस्थेच्यावतीने सामाजिक संस्थेतील मुलांना आंबे खाण्याची स्पर्धा आयोजित केली गेली. यात स्नेहालय, सावली आदिं स्वयंसेवी संस्थेतील 200 विद्यार्थ्यांनी आंब्यांचा आस्वाद मुलांनी घेतल्याने त्यांच्या चेहर्यावरील आनंद हा सर्वांचाच उत्साह वाढविणारा आहे. निरंजन संस्था नेहमीच अशा उपक्रमातून सामाजिक दायित्व जपत आहेत. मुलांच्या चेहर्यावरील हास्य हीच संस्थेच्या कार्याची पावती असल्याचे सांगितले.
याप्रसंगी अतुल डागा म्हणाले, निरंजन संस्थेच्यावतीने नेहमीच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. सन 2024 असल्यास यंदाच्यावर्घी संस्थेने 2024 मुला-मुलींचे पालकत्व घेत त्यांच्या सर्वांगिण विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबरच संस्थेच्या सभासदांच्या आनंदक्षणी मिष्ठान्न भोजन अशा संस्थेतील मुलांना दिले जाते. आजही अशा सामाजिक संस्थेतील मुलांना मनसोक्त आंबे खाण्याचा आनंद मिळवून दिला असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद धूत यांनी केले तर आभार स्वप्नील कुलकर्णी यांनी मानले. तसेच या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक बंगडीवाला परिवार यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे विशाल झंवर, सुमित चांडक, सुहास चांडक, स्वप्नील कुलकर्णी, रविकांत काबरा, राहुल झंवर, अमित खटोड, किरण मनियार, पवन बिहाणी, प्राजक्ता डागा, गौरी खटोड, रिना मनियार, दिपिका चांडक, अतुल डागा, निलेश बिहाणी, मुकुंद धूत आदिंनी उपस्थित घेतले.