पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने महारॅलीचे आयोजन
विकासाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जायचे आहे – मा. महापौर बाबासाहेब वाकळे
नगर : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना नगर दक्षिण लोकसभा महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ नगर शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयोजित सभेनिमित्त भाजपचे माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महारॅलीचे आयोजन करीत शक्तीप्रदर्शन केले.यावेळी सावेडी गाव व परिसरातून सुमारे 5 हजार नागरिक वाजत गाजत मोठ्या उत्साहात सभेच्या ठिकाणी दाखल झाले यावेळी अशोक वाकळे, किशोर वाकळे, पुष्कर कुलकर्णी, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, शहर विकासासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा निवडून द्यायचे आहे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नगर शहरात येत असून त्यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार असून सर्वसामान्य जनतेपर्यंत विकासाच्या योजना घेऊन जायचे आहे. यासाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचे आहे असे ते म्हणाले.