रेव्हेन्यू सोसायटीच्या सभासदांना वर्गणी ठेवीवर ८.२५ % व्याज
अहमदनगर –
रेव्हेन्यू ॲण्ड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटस् गर्व्हमेंट सर्व्हंटस् को- ऑप. क्रेडिट सोसायटी लि., अहमदनगर या संस्थेची कार्यकारी मंडळाची सभा संस्थेचे अध्यक्ष संदिप तरटे यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.
या सभेत सन २०२३-२४ या सालासाठी सभासदांना त्यांचे वर्गणी ठेवीवर ८.२५ % दराने व्याज देणेविषयीचा ठराव सर्वानुमते मंजूर करणेत आला. संस्थेचा कर्जाचा व्याजाचा दर ८.२५ % असूनही संस्थेने वर्गणीवर ८.२५ % दर दिलेला आहे. त्यामुळे संस्थेच्या सभासदांनी जास्तीत जास्त दरमहाची वर्गणी वाढवावी असे आवाहन कार्यकारी मंडळातर्फे करण्यांत आले. या सभेत इमारत निधी, सभासद कल्याण निधी , सभासद कन्यादान निधी, सभासद ऋणपुर्ती फंड, आयकर निधी, वेगवेगळ्या ठेवीवर द्यावा लागणाऱ्या व्याजाच्या तरतूदी अशा एकूण दोन कोटी एकोणीस लाख रुपयांच्या तरतूदीस कार्यकारी मंडळाने सर्वानुमते मंजरी दिली. संस्थेचे कार्यक्षेत्र अहमदनगर जिल्हा असून सभासद संख्या ११६० आहे. संस्थेचे खेळते भांडवल ५४ कोटी असून संस्था स्वभांडवली आहे.
रेव्हेन्यू सोसायटीस १०३ वर्षांची परंपरा असून संस्थेने सहकारी संस्थांमध्ये नावलौकीक मिळविलेला आहे . २० लाखापर्यंतचे कर्ज सभासदास विना विलंब अदा केले जाते, वर्गणी ठेव रकमेच्या ७५% पर्यंतचे कर्ज विना जामीन तत्पर, तांतडीचे कर्ज तीस हजार , मयत सभासदांचे वारसांसाठी तीन लाख चाळीस हजारांची मदत केली जाते. दरवर्षी वार्षिक सभेत मा. जिल्हाधिकारी साहेब यांचे शुभहस्ते सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा बक्षीस, ट्रॉफी देवून व सेवानिवृत्त सभासदांचा शाल, नारळ देवून सत्कार करणेत येतो.
संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीस कार्यकारी मंडळ कटिबद्ध असलेचे चेअरमन संदिप तरटे व व्हा. चेअरमन राजेश घोरपडे यांनी प्रतिपादन केले आहे. यावेळी उपाध्यक्ष राजेश घोरपडे, संचालक संतोष मांडगे, सुरेश राऊत, बाबासाहेब दातखिळे, गणेश गर्कळ, प्रविण बोरुडे, प्रदिप चव्हाण, हरिभाऊ सानप, विजय हरिश्चंद्रे, प्रदिप अवचर, वृषाली करोसिया, सुनंदा मरकड, सनी जाधव, विकास मोराळे, संतोष ताठे, संस्थेचे जनरल सेक्रेटरी बाबासाहेब पालवे उपस्थित होते.