रिमांड होम येथे आ. संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रणसंग्राम प्रतिष्ठानच्या वतीने बालकांना मिष्ठानभोजन
गरजू मुलांना आधार देण्याचे काम आपल्या सर्वांचे आहेत – वैभव वाघ
नगर : सण उत्सव वाढदिवस साजरे करीत असताना प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य पार पाडावे, आ. संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रिमांड होम येथे प्रतिष्ठानच्या वतीने बालकांना मिष्ठानभोजन देण्यात आले आहे, समाजामध्ये वावरत असताना समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून काम केल्यास ऋणानुबंध निर्माण होत असतात गरजू मुलांना आधार देण्याचे काम आपल्या सर्वांचे आहेत असे प्रतिपादन रणसंग्राम प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव वाघ यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रणसंग्राम प्रतिष्ठानच्या वतीने रिमांड होम येथील बालकांना मिष्ठानभोजन देण्यात आले, याप्रसंगी रणसंग्राम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पै.वैभव वाघ, उद्योजकभाऊसाहेब हजारे, पै.राम वाघ, मिलिंद जपे, संभाजी वाघ, उदय म्हस्के, विशाल वाघ, प्रसाद वाघ,अरुण भंडारे, गणेश वाळके, मयूर अस्मर, अशिष चोभे, स्वामी राजपुरे, अविनाश वाघ, सतिश नळकांडे,आदित्य शिर्के, ऋतिक जेटला,अदित्य वाघमारे, सचिन पटवा, करण वाघ, प्रशांत राजापुरे, श्रीराज अडिगोपुल यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
दरम्यान रणसंग्राम प्रतिष्ठानतर्फे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस रिमांड होम येथे बालकांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी येथील बालकांना मिष्टानाचे भोजन देण्यात आले.