मयत ग्रामसेवक श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील
अंमळनेर ( सुनिल आढाव ) अहमदनगर जिल्ह्यातील मांडवगण येथील ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांडे यांनी 24 सप्टेंबर वार शुक्रवारी रोजी पाच ते सहाच्या सुमारास पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील दरीत आत्महत्या केली परंतु शनिवारी रात्री उशिरापर्यंत पाटोदा पोलीस ठाण्याचे दबंग पीआय मनिष पाटील पोलीस कर्मचारी बाळू सानप ,सुनिल सोनवणे ,तांबे यांनी उशिरापर्यंत शोध घेतला परंतु त्यांची डेथ बॉडी मिळून आलेली नव्हती यामुळे हे शोधकार्य तिसऱ्या दिवशीही सुरु राहण्याचे संकेत आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील रहिवाशी असलेले आत्महत्या केलेले ग्रामसेवक गवांदे हे मांडवगण जवळच असणाऱ्या खांडगाव येथेच कार्यरत होते त्यांनी आत्महत्या कशामुळे केली ? कि कोणाच्या जाचास कंटाळून केली ? कि त्यांना कोणी आत्महत्या करण्यास भाग पाडले या सर्व बाबी तपासून या प्रकरणाचा बारकाईने तपास हा पाटोदा पोलीस ठाण्याचे दबंग पीआय मनिष पाटील हे करत आहेत.
मांडवगण येथील ग्रामसेवक गवांदे यांचे प्रेत सौताडा येथील दरीत शनिवारी रात्री उशिरापर्यंत सापडले नव्हते सौताडा येथील दरी मोठ्या प्रमाणात खोल असतांना देखील पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील हे दरीत उतरुन त्यांनी घटनास्थळा पाहणीचा देखावा न करता प्रत्यक्ष भेट देऊन तेथे उपस्थित असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सुचना केलेल्या होत्या सौताडा येथील युवकांनी देखील दरीत पडलेल्या ग्रामसेवकांची डेथ बॉडी सापडण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते कोतन येथील रावसाहेब मोतिराम माळी यांना देखील डेथ बॉडी सापडण्यासाठी विषेश पाचारण करण्यात आले होते .
सौताडा येथील दरीत आत्महत्या केलेल्या ग्रामसेवकांची डेथ बॉडी दुसऱ्या दिवशी देखील पाण्यातून बाहेर आलेली नव्हती घटनास्थळाला पाटोदा तहसीलदार सुनिल ढाकणे यांनी देखील भेट दिली होती.
सौताडा येथे दरीत आत्महत्या केलेल्या ग्रामसेवकांनी कोणाच्या तरी जाचास कंटाळूनच टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे पाटोदा पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पीआय मनिष पाटील देखील या सर्व बाबी तपासुनच तपास करत आहेत .
पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील यांनी सौताडा येथील कोसळत असणारा धबधबा न पहाता दरीत उतरुन स्व:ता घटनास्थळी बारकाईने अभ्यास केला हे चित्र मात्र कदाचित प्रथमच असावे असे बोलले जात आहे .