कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने मुस्लिम समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी काल कर्जत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक अरुण जाधव, तालुकाध्यक्ष सोमनाथ भैलुमे, दादासाहेब समुद्र चंद्रकांत नेटके,नंदकुमार गाडे,चांद मुजावर,मयूर ओहळ, गोधड समुद्र,मुन्ना पठाण,लखन पारसे,संजय शेलार,माऊली थोरात,अनिल समुद्र,हनुमंत साळवे,भारत साळवे,बापू साळवे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना राज्य समन्वयक अरुण जाधव म्हणाले की,खऱ्या अर्थानं मुस्लिम समाजासाठी आराध्य असणारे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या नावाने बिल विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मांडण्यात आले आहे.तरी हे सभागृहामध्ये तातडीने मंजूर करण्यात यावे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार व प्रभारी प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काल अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.अशा पद्धतीचे आंदोलन राज्यांमध्ये सर्वत्र करण्यात येत आहे.
या धरणे आंदोलना मधून आम्ही राज्य सरकारला विनंती करतो की राज्यातील सर्वात दुर्लक्षित असणारा मुस्लिम समाज हा राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी त्यांना देखील आरक्षणाची आवश्यकता आहे.यामुळे मोहम्मद पैगंबर बिल तातडीने मंजूर करण्यात यावे. शिवाय न्यायालयाने मुस्लिम समाजाला पाच टक्के शैक्षणिक आरक्षण दिले आहे ते तात्काळ लागू करण्यात यावे.
याशिवाय महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या मिळकतीमध्ये वाढ करून इमाम,मुअज्जिन आणि खध्दाम हरात,याच प्रमाणे संत विचारांचा प्रचार प्रसार करणाऱ्या राज्यातील सर्व ह-भ-प कीर्तनकार यांना शासनाकडून मासिक वेतन देण्यात यावे.याशिवाय वक्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेले अवैद्य कबजे हटवून त्या जागा अल्पसंख्यांक समाजाला उन्नतीसाठी देण्यात याव्यात.
सार्थी,महाज्योती, प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात यावी अशा मागण्या श्री जाधव यांनी यावेळी बोलताना मांडल्या.एवढी प्रस्ताविक तालुका अध्यक्ष सोमनाथ भैलुमे यांनी केले तर आभार गोंधड समुद्र यांनी मानले