अहमदनगर प्रतिनिधी – कोयत्याने गंभीर जखमी करून खुनाचा प्रयत्न करणार्यास नगर तालुका पोलिसांनी तीन तासामध्ये अटक केलं आहे.
नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील संदीप मुरलीधर गायकवाड (वय ३९) हा त्याच्या गावातील अमोल चांदणे याच्या भावाला घरी सोडण्याकरता गेला असता त्याच गावातील अमोल नवनाथ चांदणे (वय ३२) हा गायकवाड यास म्हणाला की,तू माझ्या भावासोबत माझ्या घरी का आला? तू मला मारायला आलतास काय? असे म्हणाला असता, गायकवाड म्हणाला की, मी तुझ्या भावाला घरी सोडविण्यासाठी आलो होतो व त्याबाबत आपण खरे-खोटे करु.
याचा अमोल चांदणे यास राग आल्याने त्याने त्याच्या हातातील कोयत्याने गायकवाड यास जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात, उजव्या हातावर, बोटावर मारुन जखमी केले व म्हणाला की, तू पोलिस स्टेशनला गेलास तर तुझे तुकडेच करुन टाकतो, असे म्हणून शिवीगाळ केली.
जखमी संदीप गायकवाड यास उपचाराकरता रुग्णालयात दाखल केल्यावर त्याने दिलेल्या जबाबावरुन खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर नगर तालुका पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवून अमोल नवनाथ चांदणे याला अटक करण्यात आली.
ही कामगिरी नगर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलिस उपनिरीक्षक रंजीत मारग, पोलिस कॉन्स्टेबल विक्रांत भालसिंग, पोलिस नाईक विशाल टकले यांच्या पथकाने केली.