अहमदनगर घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचा ८ दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

सर्व जिल्हा रुग्णालयांच्या आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारीचा आढावा होणार

योग्य दोषारोपपत्र दाखल करण्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती यांच्या सूचना

 

अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर येथील आगीची घटना अतिशय दुर्दैवी व मनाला वेदना देणारी आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून ८ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकारच्या घटना वारंवार होऊ नये. यासाठी फायर सेफ्टी ऑडीट साठी वेगळा निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद केली जाईल. सर्व जिल्हा रुग्णालयांच्या आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारीचा आढावा घेण्यात येईल. अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयास आग लागलेल्या अतिदक्षता विभागास श्री.राजेश टोपे यांनी भेट दिल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, आमदार संग्राम जगताप उपस्थित होते.

श्री.टोपे म्हणाले, अहमदनगर येथील आगीची दुर्दैवी घटना शॉक सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीला ८ दिवसाच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

सदर समितीचा अहवाल आल्यानंतर घटनेतील दोषी व्यक्तींना कठोर शिक्षा केली जाईल. या घटनेतील मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाख रुपये व राष्ट्रीय आपत्ती निधीमधून २ लाख रुपये अशी ७ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. या मदतीपोटी आज ११ जणांपैकी मृत्यू झालेल्या एका रुग्णांच्या नातेवाईकास प्रातिनिधिक स्वरूपात २ लाख रुपयांचा धनादेश राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून वाटप करण्यात आला. उर्वरित रुग्णांच्या नातेवाईकांना २ दिवसाच्या आत मदतीचा धनादेश वाटप करण्यात येईल. असेही श्री.टोपे यांनी सांगितले.

श्री.टोपे पुढे म्हणाले, या प्रकारच्या घटना वारंवार घडू नये. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही सूचना केल्या आहेत. त्यामध्ये राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांच्या ‘फायर सेफ्टी ऑडिट’ कडे जाणीवपूर्वक लक्ष देण्यात येऊन यासाठी वेगळा निधी उपलब्ध करून देण्यात बाबत चर्चा करण्यात आली. तसेच राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये ‘फायर सेफ्टी ऑफिसर’ पदनिर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अशा प्रकारच्या घटनेला सामोरे जाण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल ‘मॉक ड्रिल’ सारखे उपक्रम राबविण्यात येतील.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या, अशा प्रकारच्या घटना राज्यात वारंवार घडत असतील तर योग्य त्या प्रकारे चौकशी करून दोषारोप पत्र दाखल करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना हाती घ्याव्यात. याबाबतही राज्य सरकारला सूचना देण्यात आल्या आहेत.

या भेटीच्या वेळी आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास, संचालक डॉ. अर्चना पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मनपा आयुक्त शंकर गोरे, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विरेंद्र बडोदे, मुख्य अग्निशमन अधिकारी शंकर मिसाळ उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!