शिर्डी प्रतिनिधी – अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्यावतीने युवक काँग्रेस संदर्भात शिर्डी शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच बैठक संपन्न झाली.
महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात,आमदार डॉ.सुधीर तांबे,युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या सूचनेनुसार अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे काम नगर जिल्ह्यात केले जाईल.
जास्तीत जास्त मतदान युवक काँग्रेसला घडवण्याचा संकल्प यावेळी सर्व तालुकाध्यक्ष व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला सर्व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी युवक काँग्रेसच्या निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घेणार आहेत.
आमदार डॉ.तांबे साहेब जिल्हा युवक काँग्रेस साठी ज्या सूचना करतील त्याप्रमाणे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मतदान करणार आहोत
यावेळी कोपरगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश समन्वयक संजयजी भोसले,प्रमुख उपस्थिती प्रदेश समन्वयक बंटी भाऊ यादव, अनुसूचित जाती जमाती काँग्रेसचे प्रदेश सचिव शिवाजीराव बर्डे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस उमेश भाऊ शेजवळ,यावेळी भिमरावजी साळुंखे यांच्यासमवेत आदिवासी बांधवांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यात आला.
बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा काँग्रेसचे सेक्रेटरी उमेश भाऊ शेजवळ,तसेच कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत बागुल यांनी केले.सूत्रसंचालन शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्रजी साबळे यांनी केले.तर आभार कार्याध्यक्ष त्रिभुवन यांनी मानले.
यावेळी बैठकीसाठी उपस्थित शेवगाव काँग्रेस कमिटीचे एकनाथ कोल्हे,अकोले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सतीश वाकचौरे,सुभाष रणधीर,ज्ञानेश्वर बर्डे,उमाजी पवार,माननीय गायकवाड साहेब,सोपानराव धेनक,शांतवन भोसले,आकाश भोसले,रोहित साळवे,रामदास जगन्नाथ,भोसले रमेश सोनवणे,
यांच्या सह आदी पदाधिकारी उपस्थित होते