सुनंदा डेव्हलपर्स कार्यालयाचे उद्घाटन संपन्न
अहमदनगर प्रतिनिधी – आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सिव्हिल इंजिनियर समाजात एक महत्त्वाचा घटक आहे.त्याच्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर नवनवीन उपनगरे व वसाहती निर्माण होत आहे. उत्तम प्रकारे इमारतीचे डिझाईन तयार करून शहराच्या वैभवात भर पाडण्याचे काम इंजिनीयर करत आहेत त्यामुळे शहराच्या सौंदयात भर पडते.
सुनंदा डेव्हलपर्सचे संचालक इंजि. आदिनाथ आंबेकर व सहींता आंबेकर या दाम्पत्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासामध्ये हातभार लावला आहे.गेल्या सात वर्षांमध्ये आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून बांधकाम व्यवसाय मध्ये ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे आज स्वतःचे सुनंदा डेव्हलपर्सचे कार्यालय सुरु केले आहे.या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्या व्यवसायामध्ये प्रगती करावी असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
बुरुडगाव रोड वरील चाणक्य चौक येथे सुनंदा डेव्हलपर्सच्या कार्यालयाचे उद्घाटन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी प्रा.माणिकराव विधाते,मा.नगरसेवक सुरेश तात्या आंबेकर,मा.महापौर भगवान फुलसौंदर,संचालक इंजि.आदिनाथ आंबेकर,इंजि.सहींता आंबेकर,इंजि. विजयकुमार पादीर,इंजि.नंदकुमार बेरड, ₹एकनाथ आंबेकर,मयूर विधाते, रामभाऊ आंबेकर,खंडू बुलबुले,प्रशांत ताठे,राहुल गाडीलकर,योगेश रायकर, नितीन दळवी,पांडुरंग आंबेकर, भाऊसाहेब आंबेकर,सागर होळकर,प्रफुल्ल चोरडिया,सतीश शिंदे,आर्किटेक सागर फुलारी,इंजि. हेमंत लिंगायत आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संचालक इंजि.आदिनाथ आंबेकर म्हणले की, बांधकाम क्षेत्रामध्ये काम करीत असताना या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देणे आपले कर्तव्य समजून गेली सात वर्षांमध्ये सुनंदा डेव्हलपरच्या माध्यमातून काम करत आहे.
ग्राहकांना उत्तम सेवा,कामाची उत्तम गुणवत्ता देणेही आम्ही प्राथमिक कर्तव्य समजतो आणि तोच विश्वास आमच्यावर ग्राहकांनी दाखवला आहे त्याच विश्वासाच्या जोरावर इथून पुढे उत्तम दर्जाच्या वस्तू बनविण्यासाठी प्रयत्नशील राहू व शहराच्या विकासात भर घालण्याचे कार्य करीत राहू असे ते म्हणाले.