करंजी येथील भावले वस्तीवर दरोडा,दरोडेखोरांच्या मारहाणीत एक ठार एक जखमी़..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पाथर्डी प्रतिनिधी – अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या भावले वस्तीवर शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास दरोडा पडला असुन दरोडेखोरांच्या मारहाणीत गोपीनाथ लक्ष्मण भावले (वय वर्षे ८०) यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.पत्नी शांताबाई गोपीनाथ भावले (वय वर्षे ७६) या देखील या घटनेत गंभीर जखमी झाल्या आहेत.

घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपाधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी घटनास्थळी येऊन तपासाची चक्रे फिरवली.पोलिसांची पथके गुन्हेगारांचा शोध घेत आहे.

दरोड्यावेळी भावले वस्तीवर घरामध्ये गोपीनाथ लक्ष्मण भावले आणि शांताबाई गोपीनाथ भावले हे दोघेच होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोठा ऐवज चोरीला गेलेला नाही.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!