धामणगाव येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान… वीज पडून गाय ठार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

धामणगाव येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान… वीज पडून गाय ठार

धामणगाव:

धामणगाव जवळील हाडोळा वस्ती येथे दि ६ रोजी संध्याकाळी १० वाजण्याच्या सुमारास वीजेच्या गडगडाटसह आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला.त्यातच वीज कोसळून धामणगाव येथील शेतक-याची एक गाय ठार झाली. यात शेतकऱ्याचे ८० हजार रुपयाचे नुकसान झाले. ही घटना धामणगाव परिसरात संध्याकाळी १० वाजताचे सुमारास घडली. रात्रीच्या सुमारास धामणगाव सह परिसरात सलग तीन तास जोरदार पाऊस पडला.

हाडोळा वस्ती. या शिवारातील घटना घडलेल्या माहितीनुसार, धामणगाव परिसरात वादळी वारा व विजेच्या गडगडाटा सह रात्री जोरदार पाऊस झाला. धामणगाव परिसरात अजित अशोक बोराडे यांच्या घराजवळ बांधलेल्या जर्सी गाईच्या अंगावर वीज पडून गाय जागीच ठार झाली . यात शेतकऱ्याचे ८०हजाराचे नुकसान झाले. यावेळी धामणगाचे तलाठी सुरवसे, पशु वैद्यकीय अधिकारी धोंडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला अविलंब नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!