नवी मुंबई येथील कळंबोली गोवींदा पथकाने सात थर रचून फोडली दहीहंडी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आ.रोहित पवार यांची दहीहंडी

 

जामखेड प्रतिनिधी – नासीर पठाण – 
जामखेड – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अयोजीत केलेली दहीहंडी नवी मुंबई येथील रंजीत कट्टे पाटील मित्र मंडळ शिवप्रेरणा सुपर दर्या गोंविद पथक कळंबोली नवी मुंबई यांनी सात थर रचून दहीहंडी फोडली व प्रथम क्रमांकाचे १०११११ एक लाख एक हजार एकशे अकरा रूपयांचे बक्षिस पटकावले तर इतर तीन संघाना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून जामखेड शहरात भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन सोमवारी श्री नागेश विद्यालयात आयोजित करण्यात आले होते. या दहीहंडी स्पर्धेसाठी मराठी सिने कलाकार जय मल्हार फेम ईशा केसकर यांची विशेष उपस्थिती होती. सायंकाळी ६ वाजता या दही हंडी स्पर्धेला सुरुवात झाली.यावेळी शिव प्रेरणा सुपर दर्या गोविंदा पथक कळंबोली नवी मुंबई यांनी पाच थर रचून सलामी दिली. यानंतर संकल्प प्रतिष्ठाण इंद्रापुर, जय हनुमान संघ बारामती व शुंभूराजे तालीम जामखेड यांनी तीन ते चार थर रचून सलामी दिली.

श्री नागेश विद्यालयात सुरू झालेल्या दहीहंडी उत्सवाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.राष्ट्रवादी काँग्रेसचे गीत व आ. रोहीत पवार यांच्यावरील गीतावर उपस्थित जनसमुदायने ठेका धरला होता. नागरिकांच्या या प्रेमामुळे आ.रोहीत पवार भारावले व त्यांनी गर्दीत जाऊन ठेका धरला यावेळी काही कार्यकर्ते यांनी आ. रोहीत पवार यांना उचलून घेतले.

सुमारे साडेचार तास चाललेल्या दहीहंडी फोडण्यात कळंबोली नवी मुंबई पथकाला यश आले त्यांना आ. रोहीत पवार व मराठी सिने कलाकार बानू फेम इशा केसकर यांच्या हस्ते एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये पारितोषिक देण्यात आले.तर इतर तीन सहभागी झालेले संकल्प प्रतिष्ठाण इंद्रापुर, जय हनुमान संघ बारामती व शुंभूराजे तालीम जामखेड यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना आ. रोहीत पवार म्हणाले, गेल्या 2 वर्षांपासून कोरोना निर्बंध असल्याने दहीहंडी साजरी करता आली नाही. मुंबई व पुणे येथे मोठय़ा जल्लोषात साजरा होणारा उत्सव जामखेड सारख्या ठिकाणी साजरा व्हावा यासाठी दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.या उत्सवाला जामखेड करांनी मोठा प्रतिसाद दिला.

यापूर्वी आपण खर्डा येथे देशातील सर्वात उंच स्वराज्य ध्वज फडकवला तसेच नियोजीत नगरपरिषद इमारतीसमोर १०० फुट उंच खांबावर तिरंगा फडकला, कर्जत येथे बैलगाडी शर्यत, कर्जत जामखेड तालुक्यातील विविध विकास कामामुळे कर्जत जामखेडचे नाव देशपातळीवर गेले आहे.

मुंबई सारखे वातावरण ह्या दहीहंडी उत्सवास निर्माण झाले व हजारो नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. पुढील वर्षी यापेक्षा जास्त उत्सव कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते करतील असा माझा विश्वास असून पुढील वर्षी कर्जत येथे सर्वात उंच तिरंगा बसवण्याचा मनोदय व्यक्त केला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!