पंकजा मुंडे कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी वर प्रचंड संतापल्या…म्हणाल्या तुमच्या बालीशपणाचा मला त्रास होतो,मूर्ख कुठले.
परळी प्रतिनिधी – पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर आल्या असता त्याठिकाणी कार्यकर्ता कडून कडून पंकजा ताई अंगार है बाकी सब भंगार है,अमर रहे अमर रहे गोपीनाथ मुंडे अमर रहे,आशा घोषणा याठिकाणी देण्यात आल्या.अंगार-भंगार है या घोषणेवरून पंकजा मुंडे प्रचंड संतप्त झाल्या,यावेळी कार्यकर्त्याला चापट मारत त्यांनी संबंधित सगळ्या कार्यकर्त्यांना झापलं.अशा चुकीच्या घोषणा देणाऱ्यांना मी बोलणार हि नाही आणि भेटणार ही नाही. आपल्याला दिलेले हेच संस्कार का.? काहीही घोषणा देतात अंगार-भंगार.अशा म्हाणत संतप्त झालेल्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना चांगलेच झापले.
भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा आज परळी येथील गोपीनाथ गडावरुन लोकनेते दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन निघणार आहे,यावेळी समाधीचे दर्शन घ्यायला आलेले भागवत कराड यांना पाहून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली,यावेळी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांनी चांगलेच झापले व संतप्त झालेल्या पंकजा मुंडे म्हणाल्या तुमच्या बालीशपणाचा मला त्रास होतो मूर्ख कुठले.
या जन आशीर्वाद यात्रेला भारतीय जनता पार्टीचा झेंडा दाखवून सुरुवात केली यावेळी बीड जिल्ह्याचा खासदार प्रीतम मुंडे देखील उपस्थित होत्या.