राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित खासदार लंकेंना शुभेच्छा देत आमदारकीसाठी काँग्रेसच्या काळे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित खासदार लंकेंना शुभेच्छा देत आमदारकीसाठी काँग्रेसच्या काळे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी 
 
राष्ट्रवादीने लोकसभेच्या मदतीची विधानसभेला परतफेड करावी… किरण काळेंच्या उमेदवारीसाठी श्रेष्ठींकडे शहर काँग्रेस दावा करणार – मनोज गुंदेचा

प्रतिनिधी : लोकसभा निवडणुक विजयात निलेश लंकेंसाठी काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आ.बाळासाहेब थोरात किंगमेकर ठरले. थोरातांनी काही महिन्यांपूर्वी नगरमध्ये शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भव्य जनसंवाद यात्रेत आ.रवींद्र धंगेकर यांच्यासह उपस्थित राहत जनसंवाद सभेत ‘काळे यांना नगर शहराचे आमदार व्हावे लागेल’ असे वक्तव्य केले होते. आता काँग्रेस कार्यकर्ते, काळे समर्थकांनी शहरात जायंट किलर खा. लंके यांना शुभेच्छा देत भावी आमदार संबोधत किरण काळे यांच्या विधानसभा उमेदवारीसाठी जोरदार बॅनरबाजी केली आहे. राष्ट्रवादीने आता लोकसभेच्या मदतीची विधानसभेला परतफेड करावी असे म्हणत काळेंच्या उमेदवारीसाठी काँग्रेस श्रेष्ठींकडे शहर काँग्रेस दावा करणार असल्याचे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे. या माध्यमातून काळे समर्थकांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.

खासदारकीला इतिहास घडला, विधानसभेला आता इतिहास घडणार.. शहर बदलणार ! अशी टॅग लाईन फलकांवर देण्यात आली आहे. शहरात हा चर्चेचा विषय झाला आहे. गुंदेचा यांनी दावा केला आहे की, महाविकास आघाडी म्हणून उमेदवार जरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा असला तरी लंकेच्या विजश्रीत किंगमेकर थोरातांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले आहे. नगर शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचारात झोकून देऊन काम केले. कार्यकर्त्यांनी काँग्रेसचाच उमेदवार उभा आहे असे समजून थोरात, काळेंच्या नेतृत्वाखाली लंकेच्या विजयासाठी अपार मेहनत घेतली. काँग्रेससह महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच विखेंचे शहरातील गत वेळी पेक्षा वीस हजाराहून अधिकचे मताधिक्य घटविण्यात यश आले.

तर लोकसभेच्या मदतीची विधानसभेला परतफेड होईल : 

गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी होती. आघाडीच्या दक्षिणेतील जागा वाटपात नगर शहरासह सहा ही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार दिला गेला. काँग्रेसला एकाही मतदारसंघात संधीच मिळाली नाही. बाळासाहेब थोरात यांनी दक्षिणेतून काँग्रेसच्या चिन्हावर महाविकास आघाडीतर्फे लोकसभा लढवावी असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह होता. पण लोकसभा देखील राष्ट्रवादी लढली. आता राज्यात महाविकास आघाडी आहे. दक्षिणेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे तीन विद्यमान आमदार आहेत. पाथर्डी – शेवगाव व श्रीगोंदा – नगर मतदार संघावर देखील राष्ट्रवादीनेच दावा सांगितला आहे. नगर शहरात किरण काळेंच्या माध्यमातून काँग्रेसकडे सक्षम तरुण नेतृत्व आहे. शहरातील दहशत, गुंडगिरी विरोधात त्यांनी निर्भीडपणे नगरकरांच्या हिताची लढाई उभी केली आहे. उच्चशिक्षित असणाऱ्या काळे यांच्याकडे शहर विकासाचे व्हिजन आहे. त्यामुळे दक्षिणेतील सहा जागांपैकी शहराची एक जागा राष्ट्रवादी मोठं मन करून काँग्रेसला देत लोकसभेच्या मदतीची विधानसभेला परतफेड करेल. त्यासाठी आम्ही श्रेष्ठींकडे आग्रह धरणार असल्याचे मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे.

लवकरच थोरातांची भेट घेणार :

दक्षिणेत काँग्रेस अधिक बळकट करायची आहे. विधानसभेसह शहरात आगामी मनपा निवडणूक काँग्रेस थोरात, काळेंच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. शहर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची संघटनात्मक दृष्ट्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आव्हानात्मक जबाबदारी सुमारे पावणे चार वर्षांपूर्वी प्रदेशाध्यक्ष असताना बाळासाहेब थोरात यांनी किरण काळे यांच्या खांद्यावर सोपवली. काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचे काम काळे यांनी यशस्वीरित्या केले. लंकेंच्या विजयाचे किंगमेकर म्हणून शहर काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यासाठी आणि काळे यांच्या उमेदवारीच्या मागणीसाठी लवकरच थोरात यांची भेट घेणार असल्याचे शहर अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चूडीवाला, माथाडी कामगार काँग्रेस जिल्हाध्यक्ष विलास उबाळे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!