राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या वतीने आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी प्रतिष्ठान ट्रस्ट भजनी मंडळाला मोफत साहित्य वाटप
भजनी मंडळाच्या माध्यमातून धार्मिकतेची गोडी निर्माण होते – संदीप महाराज खोसे
नगर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अध्यात्मिक धार्मिकतेला तितकेच महत्त्व असून आजच्या युवा पिढीला त्याचे ज्ञान मिळावे यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या वतीने भजनी मंडळांना मोफत टाळ पखवाजाचे वाटप करण्यात आले आहे, त्यांनी विकास कामांबरोबर संस्कार आणि संस्कृती जोपासावी यासाठी सावेडी उपनगरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला आहे यामध्ये सर्व जाती धर्मातील लोक एकत्रित येऊन सांस्कृतिक धार्मिक वारसा जोपासण्याचे काम करत आहेत संत महंतांच्या विचारातून चांगली पिढी निर्माण होत असते असे प्रतिपादन ह भ प संदीप महाराज खोसे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या वतीने आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसा निमित्त तपोवन रोड वरील श्री स्वामी प्रतिष्ठान ट्रस्टच्या भजनी मंडळाला टाळ पखवाजाचे वाटप करताना हभप संदीप महाराज खोसे समवेत नितीन बारस्कर, हभप रविंद्र महाराज आव्हाड, हभप रंजनाताई उकिरडे, बबन पालवे, पंकज वाकळे,संतोष शिंदे, भाऊसाहेब देशमाने, एकनाथ खिलारी, राजू शिपणकर, निवृत्ती भांगे, संदीप पाटील, राजेंद्र भोसले, अनिल साबळे, अरुण आहेर, अपर्णा पालवे, सुनंदा शिखाळे, रेणुका पुंड, राणी भाकरे, स्मिता भाकरे, रोहिणी अंकुश, छाया राजगुरू, सुरेखा फुलपगारे आदी उपस्थित होते
हभप रवींद्र महाराज आव्हाड म्हणाले की, संपत बारस्कर यांनी सावेडी उपनगरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू करून समाजाला एकत्रित करण्याचे काम केले आहे, याचबरोबर विविध भजनी मंडळांना टाळ मृदुंग पखवाजाचे वाटप करत धार्मिकतेची गोडी निर्माण केली आहे सर्वांना बरोबर घेऊन विकासाच्या कामाबरोबर धार्मिकतेचे काम करत आहेत श्री स्वामी प्रतिष्ठान च्या वतीने आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांचे स्वागत करत आभार मानत आहे असे ते म्हणाले.