प्रदूषण नियंत्रणासाठी भविष्यकाळात सीएनजी गॅस किट काळाची गरज – आ. संग्राम जगताप
अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी
सीएनजी गॅस भविष्यकाळाची गरज ओळखून पाऊले उचलणे गरजेचे आहे.डिझेल, पेट्रोल मुळे मोठ्या प्रमाणात वातावरणात प्रदूषण निर्माण होत आहे.यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊन श्वासनाचे विविध आजार निर्माण झाले आहेत दिल्ली या ठिकाणी प्रदूषणाचा विळखा पडला आहे सरकार आता हळूहळू सीएनजी गॅस कडे वळत आहे.
प्रदूषणाचा धोका ओळखून आपणही सीएनजी गॅस कडे वळणे गरजेचे आहे. लालटाकी येथील भूपेंद्र ऑटो गॅस सर्विसने चार चाकी गाडीसाठी कमी वजनाचे सीनजी किटचे सिलेंडर विक्रीसाठी उपलब्ध केले प्रदूषण विरहित ही गॅस किट आहे.चार चाकी वाहनांना सदर किट बसवल्यानंतर कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही त्यामुळे नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यास मदत होईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
लालटकी येथील भूपेंद्र ऑटो गॅसच्या वतीने कमी वजनाची सीएनजी सीएनजी गॅस किटचे उद्घाटन सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी महापौर रोहिनीताई शेंडगे,स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले,मा.उपमहापौर भाऊ बोरुडे, नंदकुमार रासने,हेमंत रासने,श्रेयश रासने,भूपेंद्र रासने,आनंद पुंड,दत्ता खैरे,कैलास गाडीलकर,अनिल शिंदे,कैलास शिंदे तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रासने बंधू म्हणाले की,कमी वजनाची सीएनजी किट भूपेंद्र ऑटो गॅस मध्ये उपलब्ध झाले आहे यामुळे गाडीची चारचाकी वाहनाचे मायलेज वाढणार आहे तसेच सदरची किट बसविल्यानंतर गाडी नादुरुस्त होणार नाही व कुठल्याही प्रकारचा खर्च काढणार नाही.
हे गॅस किट शासन मान्यताप्राप्त असून हे सीएनजी गॅस किट 20 वर्ष सदर वाहनास वापरता येणार आहे. या किट मुळे प्रदूषणाचा कुठलाही धोका निर्माण होणार नाही असे ते म्हणाले.